आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत यजमान पाकिस्तान क्रिकेट टीमचा साखळी फेरीतच बाजार उठला. पाकिस्तानने साखळी फेरीतील सलग 2 सामने जिंकले. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पाकिस्तानला पावसामुळे एकमेव गुण मिळाला. एका वाक्यात सांगायचं झालं तर गतविजेता ते शून्यविजेता असा प्रवास पाकिस्तानचा राहिला. त्यानंतर आता पाकिस्तान न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. टी 20i मालिकेत 5 तर वनडे सीरिजमध्ये 3 सामने खेळवण्यात येणार आहेत.
पाकिस्तानला टी 20i क्रिकेटमध्ये नवा कर्णधार मिळाला आहे. मोहम्मद रिझवान याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतली आहे. त्याच्या जागी सलमान अली आगा याला टी 20i संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. सलमानच्या नेतृत्वात पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. टी 20i मालिकेचं आयोजन हे 16 ते 26 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. तर त्यानंतर 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.
पीसीबीने या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. पीसीबीने एकदिवसीय संघात चॅमिपयन्स ट्रॉफीतील बहुतांश खेळाडूंना कायम ठेवलं आहे. मात्र सौद शकील आणि कामरान गुलाम या दोघांचा पत्ता कट केला आहे. तसेच वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी आणि हरीस रौफ या 2 वेगवान गोलंदाजांनाी संघाबाहेर ठेवलं आहे.
पीसीबीकडून न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा
पहिला सामना, शनिवार, 29 मार्च
दुसरा सामना, बुधवार, 2 एप्रिल
तिसरा सामना, शनिवार, 5 एप्रिल.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, अकिफ जावेद, बाबर आझम, फहीम अश्रफ, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम जूनियर, मुहम्मद इरफान खान, नसीम शाह, सुफयान मुकीम आणि तय्यब ताहीर.