ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सेमीफायनलआधी रोहित शर्माची फिटनेस चर्चेचा विषय ठरला होता.
कॉंग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय कर्णधाराच्या फिटनेसवर टीका केली होती.
त्यानंतर भाजप प्रवक्ते व माजी क्रिकेटपटूंकडून त्यांना उत्तर देण्यात आले.
पण सेमीफायनलच्या सामन्यानंतर मात्र विराट कोहलीच्या फिटनेसची चर्चा होणार आहे.
विराट ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यामध्ये वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाला.
कधी तो सामन्यादरम्यान ड्राय फ्रुट्स खाताना दिसला.
तर, त्याने ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर भांगडा डान्स करत स्पेशल सेलिब्रेशन केले.
आता विराटच्या सिक्स पॅकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.