- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
If you have the ability to Love, Love yourself first.
- Charles Bukowski.
ब्रेकनंतर मी राजूचे हसतमुखाने स्वागत केले. आणि त्याला संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
‘तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी.’
‘इतरांशी वाद घालणे सोपे आहे राव, तू आपलं काहीही करायला लावतो.’ याआधी असला प्रयोग कधीही न केलेल्या राजूने जरा कुरकूरच केली.
‘स्वयंमूल्यनिर्धारणासाठी पुढील काही बाबींचा विचार करावाच. लागणार आहे. त्याशिवाय तुझ्यातील सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा आढावा कसा घेणार? सारखी धावपळ करणाऱ्या तुला जरा निवांत व्हावे लागणार आहे. मुख्य म्हणजे स्वतःच्याच प्रेमात परत परत पडावे लागणार आहे. त्रयस्थपणे स्वतःलाच असे समोर ठेवून, स्वतःचे निरीक्षण करायचे आहे.
त्याशिवाय न्यूनगंड किंवा अहंगंड कमी कसे होणार? उणिवांनी नाराज नाही व्हायच, त्यावर मात करावयाचे उपाय शोधायचे. सद्गुणांनी शेफारून जायचे नाही. तारतम्य, विवेक जागृत ठेवून सकारात्मक कृती करत रहायच्या. याआधी अशी स्तब्धता कधीच न भोगल्याने, मनाचा तळ जो उमदळलेला आहे, तो स्थिरावणार कसा?’’ मी त्याला समजावले.
पहिल्या स्तंभात उदा : संभाषण कौशल्य, आर्थिक साक्षरता, धाडस, सातत्य, करुणा, सहजाणीव, संघटन कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन अशा जीवन कौशल्यांची फक्त यादी करायची.
दुसऱ्या स्तंभात तुमच्या अंगी असणारी कौशल्ये लिहा. खात्रीचे मित्र, जवळचे नातेवाईक, सहकारी अशांची मदत घ्या. पहिल्या स्तंभात लिहिलेल्या यादीकडे नजर टाकून, त्यातले स्वतःत काय आहे हे लिहा.
तिसऱ्या स्तंभासाठी तुम्हाला फारसा आत्मविश्वास नाही, आप्तस्वकीय, इतरेजनांनी वेळोवेळी जो अभिप्राय दिला आहे, मते व्यक्त केली आहेत, त्याचा संदर्भ घ्या. स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू नका.
चौथ्या स्तंभासाठी तुमची शैक्षणिक पात्रता, विविध क्षेत्रांमधील प्रवाह, तुमची आर्थिक, सामाजिक पत, नवीन काही शिकण्याची ऊर्मी, ज्ञानलालसा आदी बाबींचा विचार करा.
पाचवा स्तंभ संभाव्य अडथळ्यांचा आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही पदार्पण करू पाहणार, त्यात येणाऱ्या अडचणींचा आहे. उदा : तुमच्याकडे संभाषण कौशल्याचा अभाव असेल तर चारचौघांत बोलण्याचा, सभा गाजविण्याचा, मिटींग्ज आयोजित करून काही मुद्दे मांडण्याचा, आत्मविश्वासच नसल्यास अशा विशिष्ट अडचणींवर तुम्हाला प्रयत्नपूर्वक मात करावी लागणार आहे. अशा ज्या-ज्या अडचणींवर मात करण्याची गरज आहे, अशा बाबी पाचव्या स्तंभात लिहा.
एकंदरीतच सर्व स्तंभ लिहिण्यासाठी, आलटून पालटून सर्वच स्तंभांचा आढावा घ्यावा लागणार आहे. पाचही स्तंभामधील परस्पर संबंध तपासून बघावे लागणार आहेत तुमची कृतिशीलता, उत्साह कायम जागरूक ठेवावी लागणार आहे.
हे सगळे वाचून राजू फार विचारात पडला. एव्हढे सगळे करण्यापेक्षा हिमालयात जाऊन संन्यास घ्यावा की कृतीप्रवण व्हावे? हे ठरवण्यासाठी राजू अंतर्धान पावला. अरेच्च्या हे तर आपण वारंवार किंवा अधूनमधून करतच असतो, असा साक्षात्कार त्याला व्हावा. कुतूहल जागृत होण्यासाठी प्रयत्न आहेत.