चॅम्पियन्स ट्रॉफीतही दक्षिण अफ्रिका माथ्यावर लागलेला चोकर्सचा डाग काही पुसू शकला नाही. उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. रचिन रविंद्र आणि विल्यमसन यांनी शतकी खेळी करत संघाला 362 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. ही धावसंख्या गाठताना दक्षिण अफ्रिकेचा डाव गडगडला. डेविड मिलरने शतकी खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण 9 गडी गमवून 312 धावांपर्यंत मजल मारता आला. हा सामना न्यूझीलंडने 50 धावांनी जिंकला. चॅम्पियन्स ट्रॉफीतील दक्षिण अफ्रिकेचा प्रवास येथेच थांबला. कर्णधार टेम्बा बावुमाने या पराभवानंतर आपलं म्हणणं मांडलं.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला, ‘मला वाटते की ते सरासरीपेक्षा जास्त होते. कदाचित जर 350 धावा असती तर आम्ही धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी स्वतःला पाठिंबा दिला असता. आज आमच्याकडे एक किंवा दोन भागीदारी झाल्या पण आम्हाला माझ्या किंवा रॅसीने पुढे जाऊन त्यांच्या दोन फलंदाजांनी जे केले त्याचे अनुकरण करण्याची गरज होती. त्यांनी सुरुवातीपासूनच आमच्यावर दबाव आणला.’
‘खरं सांगायचं तर 125 वर 1 विकेट अशी स्थिती होती. या क्षणी आम्हाला अधिक निर्णायक असायला हवे होते, विरोधी संघाला परत येण्याची दिली नसती तर बरं झालं असतं. आम्हाला सामन्यातील महत्त्वाच्या क्षणांची काळजी घेण्याची गरज होती.’, असं टेम्बा बावुमा याने पुढे सांगितलं.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क