विरोधकांनी गृहराज्यमंत्री योगश कदम यांच्याविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरु केले आहे. यावेळी कदम यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.
Pune Live : यवतमध्ये अज्ञातांकडून मारहाणीत एकाचा मृत्यू, चार जण गंभीर जखमीयवत रेल्वे स्टेशन जवळील एका घरात चड्डी बनियान घालून असलेल्या अज्ञात तीन व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास घरात घुसून घरातील पाच जणांना दगड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Kolhapur Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची अनेक कार्यकर्त्यांची धरपकडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान प्रशांत कोरटकर याला अटक करा या मागणीसाठी कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केलं जाणार होतं. त्यामुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची अनेक कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे.
Mumbai Live: मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन खात्याची मंजुरीपरिवहन खात्याने मुंबईत बाईक टॅक्सीला मंजुरी दिली आहे. एप्रिलपासून मुंबईत बाईक टॅक्सी सेवा सुरू होईल. बाईक टॅक्सी प्रति किमी ३ रुपयांइतकी स्वस्त असू शकते.
Pune Live : 8 मार्च रोजी पीएमपीएमएल बसमध्ये महिलांना मोफत प्रवासजागतिक महिला दिनानिमित्त पुण्यातील पीएमपीएमएल बसेस मध्ये मोफत प्रवास करता येणार आहे, याची घोषणा पीएमपीएमल कडून करण्यात आली आहे.
Swargate Rape Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष वकिलाची नियुक्ती होणारपुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष वकिलाची नियुक्ती होणार आहे. पुणे पोलिस विशेष वकील नेमण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवणार असून दोन दिवसांत प्रस्ताव पाठवला जाणार आहे. सुनावणीच्या वेळी विशेष सरकारी वकील पीडितेची बाजू मांडणार आहेत.
Ichalkaranji Crime LIVE : इचलकरंजीत दारूच्या नशेत पत्नीवर कुऱ्हाडीने हल्लाइचलकरंजी : दारूच्या नशेत पत्नीवर कुऱ्हाड व चाकूने हल्ला करणाऱ्या पतीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. गजानन आप्पासो शेटके (वय ५३) असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही घटना शास्त्री सोसायटी, जवाहरनगर येथे घडली. याप्रकरणी पत्नी शांता गजानन शेटके (वय ४५, रा. शास्त्री सोसायटी) यांनी फिर्याद दिली.
Shaktipeeth Highway LIVE : 'शक्तिपीठ विरोधात सांगवडेत आज सभा घेणारच'सांगवडेवाडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे गुरुवारी (ता. ६) शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील सांगवडे (ता. करवीर) येथील सभा रद्द करण्यासाठी पोलिसांकडून दबाव आहे. मात्र, हा दबाव झुगारून ही सभा घेणारच, असा निर्धार समन्वयक गिरीश फोंडे व सभेचे आयोजक प्रकाश पाटील, शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, फोंडे व प्रकाश पाटील यांना गोकुळ शिरगाव पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल, असेही या नोटिशीत म्हटले आहे.
Amit Shah LIVE : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या बंगळुरातबंगळूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (ता. ७) रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी बंगळूरमध्ये येतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी दिली. विजयेंद्र म्हणाले की, शहा तमिळनाडूहून शहराला भेट देणार आहेत. नेलमंगला येथे विश्वतीर्थ महास्वामी यांनी स्थापन केलेल्या रुग्णालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी येत नाहीत, असे विजयेंद्र यांनी स्पष्ट केले.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज पन्हाळ्यावर १३ D थिएटरचे लोकार्पणपन्हाळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी होणाऱ्या ‘पन्हाळगडाचा रणसंग्राम’ या लघुपटाचे अनावरण व इंटरप्रिटेशन सेंटरमधील १३ डी थिएटरच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
Panchganga Pollution LIVE : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी उद्या मंत्रालयात बैठकजयसिंगपूर : विधिमंडळ अधिवेशनात आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा मांडला. प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, जलद गतीने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे त्यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यांच्या या मुद्द्याची दखल घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सात मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत पंचगंगेच्या प्रदूषणप्रश्नी ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
Rahul Gandhi LIVE : विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मुंबईत उद्योजकांना भेटणारमुंबई : धारावीच्या अदानी समूहप्रणित विकासावर काँग्रेसने सातत्याने आक्षेप घेतला असताना आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा हातात घेणार आहेत. येथून विस्थापित होणाऱ्या लघुउद्योजकांशी संवाद साधण्यासाठी राहुल हे आज (ता. ६) मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्याची कोणतीही जाहीर वाचता केली जात नसली तरी ते मुंबईत दाखल झाल्यावर धारावी परिसरातील समस्यांचा वेध घेणार आहेत.
Latest Marathi Live Updates 6 March 2025 : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला. कनिष्ठ न्यायालयाने मंत्री कोकाटे यांना सुनावलेल्या दोन वर्षे कारावासाच्या शिक्षेला सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच धारावीच्या अदानी समूहप्रणित विकासावर काँग्रेसने सातत्याने आक्षेप घेतला असताना आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा हातात घेणार आहेत. येथून विस्थापित होणाऱ्या लघुउद्योजकांशी संवाद साधण्यासाठी राहुल हे आज मुंबईत दाखल होत आहेत. तर, ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या नोंदणीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ८ आणि ९ मार्चला वरळीच्या एनएससीआय डोम येथे होणारा ‘भक्तीचा महाकुंभ’ भाविकांच्या गर्दीने फुलणार हे निश्चित झाले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री पद न मिळाल्याने नाराज असलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ त्यांना मिळालेले वाशिमचे पालकमंत्रिपदही सोडणार आहेत. शिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणाऱ्या ‘पन्हाळगडाचा रणसंग्राम’ या लघुपटाचे अनावरण व इंटरप्रिटेशन सेंटरमधील १३ डी थिएटरच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. मुघल बादशाह औरंगजेबाची स्तुती करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू असिम आझमी यांचे सदस्यत्व अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेत घेण्यात आला. अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानभवनाच्या आवारात येण्याचीही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात अजूनही काही भागांत थंडी कमी झालेली दिसत नाहीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..