Kitchen Tips: उन्हाळ्यात लिंबाच्या किमती वाढण्यापुर्वीच 'असे' करा स्टोअर, 6 महिने होणार नाही खराब
esakal March 06, 2025 08:45 PM

Best way to store lemons for 6 months without spoilage: उन्हाळा सुरू झाला असून मार्चमध्ये उन्हाच्या झळा अधिक जाणवतात. यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून सर्वजण लिंबू सरबत किंवा लिंबू पाणी पितात.

पण उन्हाळ्यात मागणी वाढताच त्यांच्या किंमती गगनाला भिडतात. एप्रिल-मे महिन्यात लिंबाच्या किंमती वाढतात. यामुळे आत्ताच लिंबू खरेदी करून पुढील पद्धतीने स्टोअर करू शकता. ज्यामुळे लिंबू महाग झाले तरी तुमच्या खिशाला कात्री बसणार नाही. लिंबाचा रस स्टोअर करण्यासाठी कोणत्या सोप्या पद्धतीचा वापर करावा हे जाणून घेऊया.

बऱ्याचदा लोक बाजारातून स्वस्तात उपलब्ध असलेल्या अनेक वस्तू खरेदी करतात. त्याचप्रमाणे, जर तुम्ही बाजारातून स्वस्त लिंबू विकत घेतले असतील, तर त्याचा रस काढून साठवून ठेऊ शकता. यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

लागणारे साहित्य कोणते?

लिंबू

आइस ट्रे

लिंबू कसे साठवायचे?

जर तुम्ही स्वस्त दरात भरपूर लिंबू खरेदी केले असतील, तर तुम्ही ते सहा महिने सहज साठवू शकता. यासाठी सर्वात आधी सर्व लिंबू स्वच्छ धुवून मधोमध कापून घ्या. यानंतर, स्वच्छ भांड्यात लिंबाचा रस काढा. आता बर्फाचा ट्रे स्वच्छ करा. बर्फाच्या ट्रेमध्ये लिंबाचा रस भरा. आता ही ट्रे फ्रीजरमध्ये ठेवा. यानंतर तुम्ही याचा वापर करून कधीही लिंबाचा रसाचे सेवन करू शकता.

लिंबू साठवण्याचे अनेक मार्ग आहेत. लिंबावर मोहरी किंवा रिफाइंड तेल लावून तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये झिप लॉक बॅगमध्ये ठेवू शकता. यामुळे लिंबू लवकर खराब होत नाहीत.

लिंबू अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवल्याने ते जास्त काळ खराब होणार नाही. यामुळे लिंबू ओलाव्याच्या संपर्कात येत नाहीत आणि खराब होण्यापासून वाचतात.

तुम्ही सर्व लिंबू वेगळ्या कागदात गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून बराच काळ ताजे ठेवू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.