आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे परंतू वेळ काढू शकत नाही, फिट रहायचय परंतू जिम मध्ये जाणे परवडत नाही पण अगधी १० मिनिटाचा वेळ काढून करता येणार्या काही एक्सरसाइज तुमच्या फिटनेसवर चमत्कार करु शकतात. त्यातलाच एक प्रभावी आणि साधी व्याम म्हणजे प्लँक एक्सरसाइज.
प्लँक एक्सरसाइज म्हणजे काय ?
प्लँक एक्सरसाइज हा तुमच्या बॅाडीतील कोअर स्ट्रेंथ आणि स्टेबिलिटी वाढवण्यासाठीचा एक दमदार व्यायाम आहे.प्लैंक व्यायाम (Plank Exercise) हा एक अत्यंत प्रभावी शारीरिक व्यायाम आहे, जो आपल्या शरीरातील मुख्य स्नायूंवर काम करतो प्लैंक करतांना, शरीर एका सरळ रेषेत ठेवले जाते, ज्यामुळे शरीरातील विविध स्नायू सक्रिय होतात, विशेषत: पोट, पाठीचा कणा, आणि खांद्याचे स्नायू.
प्लँक करण्याची पद्धत :
सर्व प्रथम , पोटाच्या दिशेने जमिनीवर झोपा.
कोपरांना खांद्याच्या खाली ठेवा आणि हात ९० अंशाच्या कोणात वाकवा.
पायांच्या शरीरावर भार ठेवा आणि संपूर्ण शरीर ताठ ठेवा.
पाठीचा कणा सरळ असावा आणि पोटाचे स्नायू घट्ट ठेवावेत.
श्वास नियमित आणि गडबड न करता श्वास घ्याल.
पहिला ३० सेकंदा सोबत सुरू करा आणि हळूहळू वेळ वाढवा.
प्लँक करतांना काही टिप्स :
शरीर एका सरळ रेषेत ठेवा. मणका, पाठीचा कणा आणि गळा थोडेही झुकले नाही पाहिजेत.
शरीरातील तणाव कमी होईल असे वाटत असेल, तर थोडा वेळ कमी करा आणि पुन्हा सराव करा.
नियमितपणे प्लैंक केल्याने पोट, पाठीचे स्नायू, खांदे आणि इतर प्रमुख स्नायू मजबूत होतात.
प्लँक करण्याचे जबरदस्त फायदे
१. कोअर मसल्स मजबूत होतात
प्लँक हा विशेषत: कोअर मसल्स म्हणजेच पोट, पाठ आणि कंबर मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे शरीराच्या मधल्या भागाला मजबुती मिळते आणि स्नायूंमधील रक्ताभिसरण सुधारते.
२. शरीराचा पोश्चर सुधारतो
जर तुम्हाला सतत बसून रहाण्याच्या पाठदुखीचा त्रास होत असेल तर प्लँक तुमच्यासाठी फायदे शीर ठरू शकतो. हा व्यायाम पाठीच्या स्नायूंना बळकट करुन तुमचा पोश्चर सुधारतो.
३. खांदे आणि कलाई मजबूत होतात
जे लोक जास्त वजन उचलतात किंवा हातांचा जास्त वापर करतात, त्यांच्यासाठी प्लँक हा वरदानच ठरतो. यामुळे खांदे, कलाई आणि हातांचे स्नायू मजबूत होतात आणि लवचिकता वाढते.
४. पाठीच्या आणि कंबरेच्या दुखण्यापासून मुक्तता
नियमित प्लँक केल्याने पाठदुखी आणि कंबरेच्या दुखण्याचा त्रास कमी होतो. यामुळे संपूर्ण शरीराला आधार मिळतो आणि स्नायूंमधील ताण कमी होतो.
किती वेळ करावा प्लँक?
सुरुवातीला २०-३० सेकंदापासून सुरू करा आणि हळूहळू वेळ वाढवा. अनुभवी लोक २२-३ मिनिटे प्लँक करू शकतात, पण तेवढे टिकवण्यासाठी सरच आवश्यक आहे.
प्लँक हा फुल बॅाडी वर्कआउट का आहे?
हा व्यायाम पोट, पाठीच्या कणा, खांदे, हात, पाय, आणि नितंब अशा अनेक भागांवर परिणाम करतो. त्यामुळे संपूर्ण शरीराचे संतुलन राखण्यास मदत होते.
तुम्ही आजून सुरुवात केली नाही ?
जर तुम्ही अजून प्लँक सुरू केला नसेल, तर आजपासून सुरुवात करा. कोणत्याही उपकरणाशिवाय घरी करता येणारा हा सोपा पण प्रभावी व्यायाम तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदे शीर ठरेल. तर मग वाट कसली पाहताय चला, आजच प्लँक करून तुमच्या फिटनेसचा पल्ला गाठा
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)