हा ‘साबण’ नेमका आला कुठून ? ४ मोठे फायदे व तोटे एकदा नक्की वाचा
GH News March 06, 2025 07:14 PM

इतर प्रोडक़्ट्स प्रमाणेच साबण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण साबणाचा अनेकदा वापर करतो. पण कधी विचार केला आहे का, हा साबण नेमका कधी आणि कसा तयार झाला ? चला, जाणून घेऊया साबणाचा इतिहास आणि त्याचे फायदे-तोटे. तसच, याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे ही जाणून घेऊ

साबणाच्या शोधाबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यातील एक सर्वात लोकप्रिय कथा प्राचीन रोमशी जोडलेली आहे. असे म्हणतात की रोमाजवळच्या ‘सॅपो’ नावाच्या डोंगरावर प्राणी बलिदान केले जात असत. या ठिकाणी प्राण्यांच्या चरबी आणि राखेच्या मिश्रणातून एक लयलूट पदार्थ तयार होत असे. जेव्हा हे मिश्रण पावसाच्या पाण्या सोबत वाहून नदीत जायचे, तेव्हा लोकांना लक्षात आले की त्याने कपडे स्वच्छ होतात. याच प्रक्रियेतून साबणाचा पहिला प्रकार अस्तित्वात आला. साबनिर्मिती ही पहिला कपडे धुण्याच्या साबणापासून सुरू झाली.

याच डोंगराच्या नावावरून ‘सोप’ (Soap) हा शब्द तयार झाला, असेही मानले जाते.

प्राचीन काळातील साबणाचा वापर

१.मेसोपोटामिया (सुमारे 2800 BCE)– येथे मिळालेल्या काही पुराव्यांनुसार, लोक राख व प्राण्यांच्या चरबीचे मिश्रण करून कपडे धुण्यासाठी वापरत असत.

3.रोम (सुमारे 1st शतक BCE) – येथे लोकांनी साबणाचा वापर फक्त कपडे धुण्यासाठीच नाही, तर स्वत:च्या अंगाची स्वच्छता करण्यासाठीही केला.

4.भारत आणि चीन – भारतात आयुर्वेदाच्या माध्यमातून नैसर्गिक घटक वापरून स्वच्छतेचे महत्त्व ओळखले गेले. कडुलिंब, हळद, चंदन यासारख्या वनस्पतींमधून स्वच्छता राखली जायची.

आपल्या जीवनात साबण नसता तर स्वच्छतेची राखण करणे कठीण झाले असते. त्वचा घाण, दुर्गंधी होऊन आणि शरीरात आजारांचे प्रमाण वाढले असते. जंतांमुळे संसर्गजन्य आजार पसरले असते आणि आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम झाला असता. तसेच आपले सौंदर्य ही कमी झोले असते कारण, चेहर्‍यावर भरपूर प्रमाणात मळ जमला असता परंतू ते स्वच्छ करायला काही उपाय नसता. पण साबणाचे आपल्या शरीरासाठीचे काही फायदे आणि तोटे आहेत चला जानून घेऊ

फायदे:

1. त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी वापर होतो.

2. घामामुळे निर्माण होणार्‍या दुर्गंधाला दूर करतो.

3. जंतु आणि बॅक्टेरिया दूर करून संसर्ग टाळतो.

4. त्वचा स्वच्छ करून आपल्याला फ्रेश फिल होते.

तोटे:

1.हिवाळ्यात साबण वापरणे त्वचेला कोरडे पाडू शकते.

२.काही साबणांचे pH प्रमाण जास्त असते, जे त्वचेच्या नैसर्गिक pH ला बाधा पोहोचवते.

३. साबणातील कृत्रिम सुगंध, रंग आणि केमिकल्समुळे एलर्जी आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात .

४. रसायन युक्त साबण त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात.

आजचा साबण आणि त्याचे प्रकार

आजच्या काळात साबण केवळ स्वच्छतेसाठी नव्हे, तर त्वचेच्या आरोग्यासाठीही वापरण्यात येतो. बाजारात विविध प्रकारचे साबण उपलब्ध आहेत, जसे की:

१. ग्लिसरीन सोप – कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त, त्वचेला मृदू ठेवतो.

२. अँटीबॅक्टेरियल सोप – जंतांना नष्ट करणारा, विशेषतः हात धुण्यासाठी वापरला जातो.

३. हर्बल सोप – नैसर्गिक घटकांनी बनलेला, संवेदनशील त्वचेसाठी योग्य.

४. मेडीकडेचे सोप – त्वचेच्या रोगांवर उपचार करणारा.

५. सुगंधी आणि फॅन्सी सोप – विविध रंग, सुगंध आणि आकर्षक स्वरूप असलेले साबण.

साबणाऐवजी चेहर्‍यासाठी या पदार्थांचा वापर करा:

घरगुती उपाय जसे की बेसन, दही, हळद, मध, दुधाची साय, राईस वॉटर, टोमॅटोचा रस यांचा वापर सुरक्षित आणि पर्यावरण पूरक पर्याय ठरू शकतो.

डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.