मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट पेटलेली असतानाच आणखी एका माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. बुलढाण्यातील खामगावमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंचांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
खामगावात एक धक्कादाक घटना घडली आहे. खामगावातील माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. निलेश देशमुख असं माजी सरपंचाचे नाव आहे. तर, मयूर सिद्धपुरा अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे. मयूर आणि त्यांच्या साथीदाराने मिळून माजी सरपंचावर हल्ला केला होता.
क्षुल्लक कारणावरून माजी सरपंच आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. नंतर आरोपीनं थेट लोखंडी रॉडनं निलेश यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात सरपंच निलेश देशमुख थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या दुखापत झाली. आरोपींनी हल्ला केल्यानंतर तेथून पसार झाले.
याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. हल्ला करणाऱ्यांमधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मयूर सिद्धपुरा असे आरोपीचे नाव आहे. हल्ल्यात जखमी झालेले माजी सरपंच निलेश देशमुख यांच्यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.