3 Balls 4 Wickets: SAUD SHAKEEL ची फजिती! पठ्ठ्या झोपून राहिला अन् विचित्र पद्धतीने बाद होणारा सातवा 'नमुना' ठरला Video
esakal March 06, 2025 07:45 PM

Saud Shakeel Timed Out :मधील प्रेसिडेंट्स कप या प्रथम श्रेणी स्पर्धेत फलंदाज सौद शकील हा विचित्र पद्धतीने बाद झाला. हा टाईम्ड आऊट झाला. डावखुरा फलंदाज सामन्यादरम्यान झोपी गेला होता, ज्यामुळे त्याला क्रीजवर पोहोचण्यास उशीर झाला. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान विरुद्ध पाकिस्तान टेलेव्हिजन या लढतीत हा मजेशीर प्रसंग घडला. टाईम्ड आऊटने बाद होणारा सौद शकील हा पहिला पाकिस्तानी, तर जगातील सातवा नमुना ठरला.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (एसबीपी) आणि पाकिस्तान टेलिव्हिजन (पीटीव्ही) यांच्यातील सामन्यात शकीलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायची होती. प्रेसिडेंट्स कपच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन चेंडूत दोन विकेट पडल्यानंतर २९ वर्षीय फलंदाज मैदानावर उशिरा आला. त्यानंतर पीटीव्हीचा कर्णधार अमद बटने त्याच्या अपील केले आणि तीन मिनिटांच्या आत तो मैदानावर न आल्याने शकीलला बाद दिले गेले. २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूला अशाच प्रकारे बाद झाला होता.

उमर अमीन आणि फवाद आलम या जोडीला वेगवान गोलंदाज मुहम्मद शहजादने दोन चेंडूंतच बाद केले, ज्यामुळे हॅटट्रिकची संधी मिळाली होती.काही वृत्तांच्या मते शकील लवकर फलंदाजी मिळणार नाही, या आशेने झोपी गेला होता. पण, पटापट विकेट गेल्याने त्याचा गोंधळ उडाला आणि तो निर्धारित ३ मिनिटांत गार्ड घालून मैदानावर फलंदाजीला येऊ शकला नाही. शकील बाद झाल्यानंतर इरफान खान फलंदाजीला आला. शहजादने त्याला त्रिफळाचीत केले आणि हॅटट्रिक पूर्ण केली. अशा प्रकारे ३ चेंडूंत ४ विकेट्स पडल्या. सलग विकेट गमावल्याने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानची धावसंख्या १ बाद १२८ वरून ५ बाद १२८ अशी घसरली.

What is timed out?

क्रिकेटमध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाने तीन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचणे अपेक्षित असते. जर फलंदाज असे करण्यात अयशस्वी झाला तर त्याला 'टाईम्ड आऊट' बाद दिले जाऊ शकते. क्षेत्ररक्षण करणारा संघ टाइम्ड आऊटसाठी अपील करू शकतो.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत टाईम्ड आऊट होणारे ७ नमुने
  • अँड्र्यू जॉर्डान - १९८८

  • हेमुलाल यादव - १९९७

  • व्हॅसबर्ट ड्रेक्स - २००२

  • अँड्र्यू हॅरिस - २००३

  • रायन ऑस्टिन - २०१४

  • चार्ल्स कुंजे - २०१७

  • सौद शकील - २०२५

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.