Video : 'ससुराल गेंदा फुल' मैत्रिणीच्या हळदीत कतरिनाचा धमाल डान्स ; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले..
esakal March 06, 2025 07:45 PM

Bollywood Entertainment News : अभिनेत्री आता फक्त अभिनेत्री म्हणून तर कौशल कुटूंबाची लाडकी सून म्हणूनही प्रसिद्ध झालीये. तिचा विकीच्या कुटूंबाबरोबर असलेला बॉण्ड त्यांचे व्हायरल होणारे व्हिडीओज सगळेचजण पसंत करतात. विकीच्या आईबरोबर तिने महाकुंभला लावलेली हजेरी असो किंवा त्यांचं एकत्र सण साजरं करणं असो तिच्या या व्हायरल व्हिडीओजवरून ती संसारी स्त्री झालीये हे स्पष्ट समजत. नुकताच तिचा एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल होतोय.

नुकतीच तिच्या मैत्रिणीच्या हळदीला हजेरी लावली. यावेळी तिने नुसतीच हजेरी न लावता तेथील लोकांबरोबर ठुमकेही लावले. दिल्ली 6 मधील गाजलेल्या ससुराल गेंदा फूल गाण्यावर कतरीनाने धमाल डान्स केला. सोशल मीडियावर तिचा हा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

राखाडी रंगाच्या ड्रेसमध्ये कतरिनाचा डान्स करतानाचा व्हिडीओ अनेकांना आवडला. तिच्या अदांवर नेटकरी फिदा झाले आहेत. 'परफेक्ट बहू' अशी कमेंट अनेकांनी या व्हिडिओवर केलीये. "किती दिवसांनी कतरीनाचा डान्स पाहिला.","मस्त मिसेस कौशल" अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडिओवर केल्या आहेत.

दरम्यान टायगर 3 नंतर अजून तरी कतरीना कोणत्याही नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली नाहीये. त्यामुळे ती बॉलिवूडमध्ये कमबॅक कधी करणार याकडे चाहते लक्ष ठेवून आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.