नागपूर : कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गानगर सुंदर बिस्कीट फॅक्टरीमागे राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्घाच्या खुन समलिंगी संबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हेशाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अल्पवयीन आरोपीला बालाघाट येथील मोहगाव परिसरातून अटक केली.
कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ फेब्रुवारीला दुपारची साडेचार वाजताच्या सुमारास ६५ वर्षीय वृद्धाच्या घरात शिरून त्यांचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी लुटपाट करण्याच्या निमित्ताने ही घटना झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
दरम्यान या प्रकरणाचा समांतर तपास करीत असताना, गुन्हेशाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप बुआ यांच्या नेतृत्वातील पथकाने संपूर्ण सीसीटीव्ही आणि सीडीआरची तपासणी केली. त्यावेळी एक अल्पवयीन मुलाचा क्रमांक समोर आला. त्याच्या तपास करून ताब्यात घेत, विचारणा केली असता, त्याने घटनेचा खुलासा केला. यावेळी त्याने दिलेल्या माहितीमधून धक्कादायक प्रकार समोर आला.
अशी घडली घटनाअल्पवयीन आरोपी हा मडावी यांच्या घराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करायचा. वृद्धाने त्याचेशी गोड बोलून त्याला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याला घरी बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचारही केला. दरम्यान त्याला दुसऱ्यांदा बोलाविल्यावर त्याने येण्यास नकार देत, ही बाब त्याच्या नातेवाइकांना सांगणार असल्याची धमकी दिली.
यावेळी वृद्धाने त्याला धमकी दिली. याशिवाय किचनमधून लपवून चाकू आणला. तो आरोपीला दिसताच, त्याने टिव्हीजवळ असलेल्या ब्लेडने त्याच्यावर वार करून जखमी केले. यानंतर पापाने त्याचा पाय पकडताच, त्याचा खाली पडलेला चाकू हिसकावून त्याने त्याच्यावर वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले.
रोज बनवायचा मॅगीवृद्धाच्या घराजवळील सर्वांशीच अतिशय चांगला बोलायचा. त्यामुळे त्यांच्यावर कधीही कुणाला शंका येत नव्हती. मात्र, त्याला मुलगा आवडल्याने त्याने त्याला हेरण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मुलासाठी दररोज मॅगीही तयार करून देण्यास सुरुवात केली. याशिवाय घरी काम असल्याचे सांगून त्याला बोलावून घेतले होते. त्याला घरी मॅगी बनवून चारत त्याचेशी संबंध प्रस्थापित करायचा.