उत्तराखंडमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाच्या चौथ्या दिवशी भाविकांना संबोधित करण्यासाठी कथाकार जया किशोरी सहभागी झाल्या होत्या. यानंतर त्या ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनमध्ये गेल्या.
जया किशोरी परमार्थ निकेतनला गेल्या असता स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांना भेटल्या.
कार्यक्रमात सहभागी
संध्याकाळची आरती,भक्तीगीत कार्यक्रमात सहभाग घेतला.यावेळी त्यांच्याबरोबर एक विदेशी साध्वी दिसून आल्या कोण आहेत त्या जाणून घेऊ...
या साध्वी आहेत अंबिका देवी. ज्या किशोरवयात कृष्णभक्तीची आस लागल्याने कोलंबियाहून भारतात आल्या होत्या.
'मला खूप लहानपणापासूनच भारताबद्दल आकर्षण होते. हिंदू लोक त्यांची संस्कृती,परंपरा खूप वेगळी आहे', अस त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
कृष्णाची भक्ती करण्यासाठी मॉडेलिंगचे करिअर सोडत 2016 ला त्या भारतात आल्या आणि कायमच्या येथेच स्थायिक झाल्या.
अंबिका देवी या भारतात येण्याआधीपासून म्हणजेच वयाच्या 13 व्या वर्षापासून योगामध्ये पारंगत आहेत.
अंबिका देवी त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ उत्तराखंड ऋषिकेशमध्ये घालवला आहे.