भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : शहरातील देऊ नगर परिसरातील एका इमारतीमध्ये दोन गटांत शुल्लक कारणावरून हाणामारी झाली. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात दोन्ही गटांवर गुन्हा दाखल आहे.
देऊ नगर येथील जोया अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहणारा नजीर अन्सारी याच्या आईला इमारतीमधील दुकानदार इब्राहिम शेखने शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी दुकानात गेलेल्या नजीरला इब्राहिम शेखने मारहाण केली. या हल्ल्यात नजीरच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले. नजीरनेही त्याच्या दोघा मित्रांच्या मदतीने इब्राहिम शेखला मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे.