चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.
अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन तगडे संघ आमने-सामने असणार आहेत.
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना होईल.
या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आत्तापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द झाले आहे. पण हे सामने पाकिस्तानमध्ये होणार होते.
दुबईत अंतिम सामन्यावेळी पावसाची चिन्ह नाहीत. मात्र तरीही जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर ९ मार्चला हा अंतिम सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर काय होणार?
अंपायर्स ९ मार्च रोजीच हा सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. पण जर सामना पूर्ण होऊच शकला नाही, तर १० मार्च हा राखीव दिवस सामन्यासाठी असणार आहे.
त्यामुळे जर ९ मार्चला सामना पूर्ण झाला नाही, तर तो १० मार्चला राखीव दिवशी पूर्ण केला जाईल.
दरम्यान, जर राखीव दिवशीही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर मात्र दोन्ही संघांना संयुक्त रित्या विजेतेपद दिले जाईल.