शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड चे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा दिली होती यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली होती एकूणच जिल्ह्यातील महायुती अंतर्गत शिमगा सुरू झाल्याने आता शिवसेनेला थोरवे यांच्या वक्तव्याने उपरती आली आहे, थोरवे यांचे ते वक्तव्य चुकीच्या ठिकाणी होते शिवसेना त्याचे समर्थन करत नाही उलट एकनाथ शिंदे सह मंत्री उदय सामंत यांनी देखील थोरवे यांना समज दिली असून यापुढे महायुतीत वाद निर्माण होईल असे वक्तव्य करू नये अशा सुचना देण्यात आल्याची माहिती रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली
Beed : धनंजय देशमुख कुटुंबीयांसह मोर्चासाठी मस्साजोगहून बारामतीच्या दिशेने रवानासरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मारेकऱ्यांना कठरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी बारामती मध्ये उद्या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चासाठी स्वतः देशमुख कुटुंबीय उपस्थित राहणार आहे याच्यामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मुलगी वैभवी देशमुख मुलगा विराज देशमुख हे सहभागी होणार आहेत मसाजोग मधून देशमुख कुटुंबीय बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहेत
धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला नाही असं आम्ही समजतो - जयंत पाटीलअन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला नाही असं आम्ही समजतो, असे विधान शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अकलूज केले.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला हे मुख्यमंत्र्यांनी सभागृह बाहेर जाहीर केले आहे. खरं तर सभागृहांमध्ये त्यांच्या राजीनाम्याची माहिती देणे अपेक्षित आहे. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही त्यांच्या राजीनामा बाबत सभागृहाला कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांचा अजून राजीनामा झालेला नाही अस आम्ही समजतो.
गौरव आहुजाचा मित्र भाग्येश निबजीया पोलिसांच्या ताब्यातयेरवडा घटनेतील आरोपी गौरव अहुजा याचा भाग्येश हा मित्र
भाग्येश हा आहुजा याच्या गाडीत शेजारी बसला होता
पुण्यातूनच भाग्येश याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती
मनोज आहुजा यांच्या हॉटेलमध्ये महिलांचं आंदोलनयेरवडा प्रकरणातील आरोपी गौरव आहुजा यांच्या हॉटेल बाहेर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन चालू असताना स्वारगेट येथील आहुजाचा बार चालू होता. त त्यामुळे आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्यां बारमध्ये घुसल्या. बार बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढलं.
मित्रासोबत मिळून पत्नीचा काटा काढण्याचा नवऱ्याचा प्रयत्नरायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील धक्कादायक घटना
स्क्रू ड्रायव्हरने केले पत्नीच्या मानेत वार
जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस ठाण्याचा कारभार महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांनी चालवला.जागतिक महिला दिनानिमित्ताने सांगलीच्या मिरजेत पोलीस चौकीचा सर्व कारभार महिला कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात आला.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या मध्ये आत्मविश्वास वृद्धीत व्हावा या उद्देशाने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचा दिवसभराचा सर्व कारभार महिला पोलिसांची कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या टोळीच्या वनविभागाने आवळल्या मुस्क्यातीन वाहनांसह सहा आरोपी वनविभागाच्या ताब्यात.
वन विभागाने स्वतः व्यापारी बनत सापळा रचून फिल्मी स्टाईल पाठलाग करून जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात ही कारवाई केली.
खा. उदयनराजे भोसले झाले "डॉक्टर"कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्यातर्फे खा. उदयनराजेंना डॉक्टरेट पदवी...
जान्हवी इंगळे या युवतीचा अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये योगासनामध्ये 12 विश्वविक्रम केल्याबद्दल खा.उदयनराजे यांच्या हस्ते सन्मान
हिंम्मत जाधव , पोलीस उपायुक्त, झोन ४येरवडा येथील घटनेच संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करणे, सार्वजनिक वाहतूकीस अडथळा निर्माण करणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संबंधित तरुणाला शेधण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर त्याने मद्यपान केले होते की नाही हे स्पष्ट होईल. शक्तिपीठ महामार्ग समर्थन मेळावाकोल्हापूर जिल्ह्यात एका बाजूला शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी विरोध होत असताना दुसऱ्या बाजूला महायुतीच्या वतीने शक्तिपीठ महामार्ग समर्थन देण्यात येत आहे. या समर्थनासाठी आज कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग समर्थन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भाजपाचे खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थिती या मेळाव्याला सुरुवात आलेली आहेत. या मेळाव्याला कागल, शिरोळ, आजरा, चंदगड, या तालुक्यातील शेतकरी उपस्थित आहेत. या महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांनी वेगवेगळे ठराव मांडून आपल्या मागण्या शासनासमोर मांडलेले आहेत.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी या मागणीसाठी पाथर्डी कडकडीत बंदमस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या घटनेतील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करावी.
तसेच सर्व आरोपींची संपत्ती जप्त करावी. या मागणीसाठी शनिवारी पाथर्डी शहर उस्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाथर्डी शहरातून मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
सकाळपासूनच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला..
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
नवी पेठ, क्रांती चौक, अजंठा चौक, मेन रोड मार्गे नाईक चौकात विविध कार्यकर्त्यांची भाषणे होऊन या घटनेचा निषेध व्यक्त करत मोर्चाचा समारोप करण्यात आला.
Pandharpur: विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याची शक्यतामंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू...
विठ्ठल मंदिरावरील कळसाचे काम सुरू करण्यात येणार आहे...
या कामासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता...
या संदर्भात मंदिर समितीची ची तातडीची बैठक....
जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्या उपस्थितीत होणार बैठक...
मागील वर्षी तीन महिने मंदिर होते बंद....
त्यानंतर विठ्ठल मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता.....
Jalna: जालना पोलिसांकडून महिलादिनी सव्वा लाख विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप करणारआज जागतिक महिला दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहे.
महिला दिनानिमित्त जालना पोलिसांकडून सुरक्षा मंत्र आधुनिक जगात एक पाऊल पुढे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलय.
जालना पोलिस जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप करणार आहे.
सुरक्षा मंत्र या पुस्तकात ऑनलाइन सुरक्षितता, महिला अत्याचार विरोधी कायद्यासह बाललैंगिक शोषणाविरोधातील कायद्याची माहिती देण्यात आली आहे.
तसेच फोटो मॉर्फिंगसह सोशल मीडियाच्या वापराबाबत देखील महिला आणि बालकांना सुरक्षा मंत्र या पुस्तकांमध्ये पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आल आहे.
Kalyan: जागतिक महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणमध्ये महिलांचा “साडी वॉकेथॉन”कल्याण पश्चिमेतील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून या साडी वॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला.
ज्यामध्ये कल्याण शहरातील डॉक्टर, उद्योजक, नोकरदार, गृहिणी अशा सर्वच गटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांनी भारतातील महिलांचा पारंपरिक वेश म्हणून समजला जाणारा जाणाऱ्या साडी नेसून या उपक्रमात भाग घेत ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृतीचा संदेश दिला.
ज्यामध्ये केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, डॉ. सारिका दुबे, डॉ. किरण शिंदे, डॉ. सोनाली पाटील या आघाडीच्या महिलांनी यामध्ये पुढाकार घेतल्याचे दिसून आले.
Buldhana: जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशमुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे..
अपात्रतेचे आदेश संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत..
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, पोटनिवडणुकीत राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या सदस्यांना एक वर्षाच्या आत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते..
जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास निवडून आलेल्या सदस्यांना अपात्र घोषित करण्यात येते...
महाराष्ट्र शासन राजपत्र सन-२०२३ च्या अध्यादेशानुसार १० जुलै २०२३ मधील वाढीव मुदतीतही जातप्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायत सदस्य अपात्र घोषित करण्याविषयी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी आदेश जारी केले आहेत...
यामुळे एकच खळबळ उडालीय ..
अमरावती शहरात तबल 350 मोबाईल टॉवर अनधिकृत; केवळ 83 मोबाईल टॉवरलाच पूर्वपरवानगीजोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत शहरात उभारलेले हे टॉवर अनधिकृत ठरवले आहेत...
शहरातील अनधिकृत टॉवर मूळे महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला...
शासनाची नियमावली निश्चित तरी अवैध मोबाईलची अवैध टावरची उभारणी सुरूच....
महानगर पालिकेच्या या टॉवर कडे दुर्लक्ष....
सतीश भोसले व त्याच्या साथीदारांनी कैलास वाघला केली होती बेदम मारहानदीड वर्षांपूर्वी सिंदखेडराजा तालुक्यातील माहेरखेड येथील कैलास वाघ या तरुणाला उचलून बीड जिल्ह्यात नेऊन सतीश भोसले व त्याच्या साथीदारानी बेदम मारहान केली होती..
त्याची तक्रार कैलास वाघ याने त्याचवेळी सिंदखेडराजा पोलिसात दिली होती .. ती तक्रार बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आली होती ..
आता मारहानीचा व्हिडीओ वायरल झाला त्यानंतर पोलिसाना जाग आली व बीड जिल्ह्यातील शिरूर पोलीस टीम कैलास वाघ याचा जाब घेण्यासाठी सिंदखेडराजा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली...
कैलास वाघ ला सिंदखेडराजा पोलीस स्टेशन ला बोलाविण्यात येऊन त्याचा जवाब नोंदविण्यात आहे....
अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल न्यू प्रशांतमधून ४ बांग्लादेशी महिलांना घेतले ताब्यातश्रीगोंदा पोलिस आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त करावाई...
कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती...
बांगलादेशात बेरोजगारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची महिलांकडून देण्यात आली माहिती...
मुरसनिला सिकंदर, रोमाना रूमी, सानिया खान, सानिफा खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांची नाव...
श्रीगोंदा पोलिसात गुन्ह्याची, नोंद पुढील तपास सुरू...
सांस्कृतिक कार्यमंञी आशिष शेलार यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह केली तुळजाभवानी मंदिराची पाहणीतुळजाभवानी मंदीरात सुरू असलेल्या जिर्णोद्धार कामाची पाहणी करत जाणुन घेतली माहिती
तुळजाभवानी मंदीराच्या पाहणीनंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सुरू केली आढावा बैठक
पुरातत्व विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर मंदीराचे शिखर खाली उतरवुन नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता विरोध
संभाजीराजे छत्रपती यांच्या पाहणी दौऱ्यानंतर सांस्कृतिक कार्यमंञी आशिष शेलार ही तुळजापूरात
शिखर खाली न उतरवता व प्राचीनतेला धक्का न लावता काम करण्याची संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे मागणी
राज्य पुरातत्व विभागामार्फत नव्हे तर केंद्रीय पुरातत्व विभागाला आमंत्रित करुन निर्णय घेण्याचा संभाजीराजे यांनी दिला होता सल्ला
मंदीराच्या शिखर व गाभाऱ्याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंञी शेलार काय सुचना देणार याकडे सर्वांचे लक्ष?
Maharashtra Politics: मुंबई गोवा महामार्गात कोट्यावधी रुपयांचा डांबर घोटाळामुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका,
तळंकाटे ते वाकेड दरम्यान पडलेल्या खड्याचे पॅचवर्कच्या कामात भ्रष्टाचार
याचिकेत आरोप असलेली कंपनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या वडिलांची
आर. डी सामंत कंपनीने मुंबई गोवा महामार्गावर डांबर न टाकता कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप
रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी दाखल केली याचिका
कंपनीसह भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करावा याचिकेत मागणी
न्यायालयाने कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी आणि नगरपरिषद या प्रतिवादिंना पाठवली नोटिस
पुढील सुनावणी ९ एप्रिल रोजी होणार
Mumbai-Nashik Highway: शहापूर मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीमुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील खर्डी जवळ रेल्वे ब्रिज जवळ रस्त्याचे काम सुरू आहे यामुळे वाहतूक एकेरि मार्गाने सुरू आहे मात्र छोटे वाहन समोरासमोर आल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे एक ते दोन किलो मीटर च्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
Pune: कोरेगाव पार्क हद्दीतील अवैध स्पा सेंटरवर बुलडोझरपोलिस प्रशासन आणि पुणे महानगर पालिका आक्रमक
दिवसें-दिवस वाढत आहेत कोरेगाव पार्कमध्ये अवैध स्पा सेंटर
अनेक ठिकाणी स्पा सेंटर मध्ये चालतो वेश्या व्यवसाय
यामुळे स्थानिकांनी केल्या होता तक्रारी
अनेक स्पा सेंटर अनधिकृत बांधकाम असल्यामुळे महापालिकेला सोबत घेत चालवण्यात आला बुलडोझर
Pandharpur: पंढरपुरातील रस्त्यांची कामे रखडल्याने नागरिक त्रस्तपंढरपूर शहरातील कामे रखडली आहेत. यामुळे शहरातील वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पंढरपूर शहरात सध्या 11 रस्त्यांची कामे सुरू आहेत.
ही कामे मागील वर्षभरा पासून संथ गतीने सुरू आहेत.
तर काही ठिकाणी ची कामे बंद आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उकरून ठेवल्याने धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करावीत अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यात 22 हजार लाडक्या बहिणी अपात्र, 35 महिलांनी स्वतःहून लाभ सोडलामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अमरावती जिल्ह्यातील 22 हजार 68 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहे..
निकष लावण्यात आले त्या निकषात त्यांना अपात्र करण्यात आले, तर 35 महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ सोडला आहे,
आता अमरावतीत 6लाख 98 हजार 536 महिला पात्र ठरल्या आहे..
तर आज महिला दिनानिमित्त सर्व महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यात येणार असल्याची माहिती आहे..
Beed Politics: मस्साजोग ते बीड काँग्रेसची 51 किलोमीटर सद्भावना पदयात्रा रॅलीला सुरुवातसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना पदयात्रा काढली जाते आहे. मस्साजोग गावात सरपंच देशमुख यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून सद्भावना पद यात्रेला सुरुवात होणार आहे.
मस्साजोग ते बीड असा 51 किलोमीटरचा पायी प्रवास सद्भावना पदयात्रेचा असणार आहे. यादरम्यान एक मुक्काम नेकनूर येथे करून यात्रा उद्या बीडमध्ये दाखल होणार आहे. सद्भावना सभेच्या माध्यमातून रॅलीचा बीड मध्ये समारोप होईल.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्या सह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यात्रेत सहभागी होणार आहेत.
Hingoli: वसमत तालुक्यातील ढवळगावमध्ये रहिवाशी घरांना भीषण आगहिंगोलीच्या वसमत तालुक्यातील ढवळगाव येथे दोन घरांना भीषण आग लागून मोठे नुकसान झाले आहे ,
रात्री उशिरा अचानक ही आग लागली आहे
दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील संसार उपयोगी साहित्य सोन्या-चांदीचे दागिने या सह रोख रक्कम धान्याचा साठा जळून खाक झाला आहे,
या आगीत जळून खाक झालेली दोन्ही घरे शेतकरी कुटुंबाची असून उमराव क्षीरसागर व बळीराम क्षीरसागर अशी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत,
वसमत ग्रामीण पोलिसांनी या आगीच्या घटनेची नोंद केली आहे, ही आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही
Navi Mumbai: नवी मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाचा गलथान कारभार, परस्पर काढल्या 5 कोटींच्या निविदानवी मुंबई मनपाच्या सर्व शाळांमध्ये सोलार ऑपरेटेड रोबोटिक कोडिंग आर्टिफिशीअल इंटेलिजन्स प्रयोगशाळा उभी करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवी मुंबई मनपा प्रशासनाला 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा निधी पालिकेकडे वर्ग झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.
नियमानुसार या निविदेवर शहर अभियंता आयटी विभाग, कार्यकारी अभियंता आयटी विभाग, लेखा अधिकारी आणि सल्लागार यांचा अभिप्राय घेणे आवश्यक होते.
मात्र तसे काहीच न करता ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात अली असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झालेय.
त्यामुळे या टेंडर प्रक्रियेमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अभयचंद्र सावंत यांनी केलाय.
Ratnagiri: रत्नागिरीतील हातखंबा झरेवाडी येथे पाणलोट रथयात्रेचे स्वागतकेंद्रातून आलेला पाणलोट रथाचं सध्या जिल्ह्यात गावागावा केले जातोय स्वागत
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात राबवला जातो उपक्रम
मृदा व जलसंधारण संवर्धन आणि उपजीविका घटकांचे संवर्धन करणे हा यामागचा उद्देश
गँबीयन बंधारा , वळण बंधारा, संयुक्त गँबीयन बंधारा, काँक्रीट सिमेंट नाला बांध या उपक्रमातून बांधले जातात
2026 पर्यंत हा केंद्राचा उपक्रम संपुर्ण देशभरात राबवला जाणार
Washim: जागतिक महिला दिनानिमित्त शेलूबाजार इथ महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनवाशिमच्या शेलुबाजार इथ महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांना सामाजिक व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्यासाठी शेलूबाजार ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा यासाठी या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं.
ही स्पर्धा इथ पहिल्यांदाच घेण्यात आलीये.
यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गटाच्या महिला तसेच शाळकरी मुली सहभागी झाल्या होत्या.
या स्पर्धेला वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली.
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीत कंटेनर रेकसुरुनिर्यात आणि आयात क्षेत्रात कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.
आता रत्नागिरीतून थेट जेएनपीटी बंदरात येथील उत्पादने पाठवता येणार आहे.
याचा शुभारंभ गद्रे मरीन एक्सपोर्ट पहिल्या वीस मिनी कंटेनर रेक ने करण्यात आला आहे.
या करिता कोकण रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे.
यापूर्वी गोव्यातून रवाना होणाऱ्या रेक मधून जिल्ह्यातील उत्पादने निर्यातीसाठी पाठवली जात होती.
पण आता कोकण रेल्वेने या विषयात मोठे पाऊल उचलत रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूक ची यंत्रणा उभी केली आहे.
यामुळे आता निर्यात होणारा माल रत्नागिरी तून थेट जेएनपीटी बंदरात रवाना होणार आहे
Bhandara: भंडाऱ्याच्या तुमसर येथे राजमुद्रा ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त महिला मॅरेथॉनचे आयोजनभंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राजमुद्रा ग्रुप च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून तुमसर शहरात भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून या मॅरेथॉनमध्ये तुमसर शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात 27 हजार लाडक्या बहिणींनी अपात्रनवीन निकष व अटींची कात्री लावण्यात आली यामुळे आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात एकूण 27 हजार 317 लाडक्या बहिणींना अपात्रेचा धक्का सहन करावा लागला.
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली.
निवडणुकीच्या काळात अर्ज करणाऱ्या महिलांना सहसकट लाभ देण्यात आला.
जिल्ह्यात सात लाख 19 हजार 850 महिलांनी अर्ज केले होते त्यात सहा लाख 92 हजार 563 अर्ज पात्र ठरले.
कागदपत्राच्या पडताळणीत अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा वाढत जाऊन तो आता 27 हजार 317 वर पोहोचला आहे.
Dharashiv: उष्माघातापासुन बचावासाठी आरोग्य विभागाकडुन रुग्णालयात केली कोल्ड रुमची स्थापनाधाराशिव जिल्ह्यात तापमान झपाट्याने वाढत असुन संभाव्य उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाने प्रतिबंधकात्मक व उपचारात्मक उपायोजना केल्या असुन धाराशिव जिल्ह्यातील 5 ग्रामीण रुग्णालय 6 उपजिल्हा रुग्णालय, 44 प्राथमिक आरोग्य केंद्र व 2 शहरी आरोग्य केंद्रामध्ये कोल्ड रुमची स्थापना करण्यात आली आहे. उष्माघाताच्या उपचारासाठी सर्व आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध ठेवण्यात आला असुन गंभीर. स्थितीत 108 किंवा 102 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा तसेच नागरीकांनी उष्णतेकडे दुर्लक्ष न करता आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.
Ashish Shelar: मंञी आशिष शेलार आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरराज्याचे सांस्कृतिक कार्यमंञी आशिष शेलार आज धाराशीव जिल्हा दौऱ्यावर येत असुन तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत.
तर सकाळी १० वाजता पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार असुन तुळजाभवानी मंदीरात सुरू असलेल्या जिर्णोद्धार कामाची देखील पाहणी करणार आहेत.
Maharashtra Politics: मस्साजोग ते बीड काँग्रेसची ५१ किलोमीटर सद्भावना पदयात्रासरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काँग्रेसच्या माध्यमातून सद्भावना पदयात्रा काढली जाते आहे.
मस्साजोग गावात सरपंच देशमुख यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करून सद्भावना पद यात्रेला सुरुवात होणार आहे.
मस्साजोग ते बीड असा 51 किलोमीटरचा पायी प्रवास सद्भावना पदयात्रेचा असणार आहे. यादरम्यान एक मुक्काम नेकनूर येथे करून यात्रा उद्या बीडमध्ये दाखल होणार आहे. सद्भावना सभेच्या माध्यमातून रॅलीचा बीड मध्ये समारोप होईल.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यात्रेत सहभागी होणार आहेत.