Maharashtra Politics News live : लाडकी बहीण योजनेचा एकच हफ्ता जमा
Sarkarnama March 09, 2025 07:45 PM
Delhi News : राजधानीत 'महिला समृद्धी योजना' लागू

दिल्लीतील भाजप सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी महिला समृद्धी योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2500 रुपयांची मदत सरकार महिलांना देणार आहेत. शनिवारी (ता.8) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतला.

Sanjay Raut News : बाळासाहेबांच्या विचारांचे बुस्टर देत राहू : संजय राऊत

ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना फुटीवरून भाष्य करताना ठाकरे गट फुटीनंतरही शिवसेनेत असणाऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारांचे बुस्टर देत राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करताना, पाकव्याप्त काश्मिर भारतात घेण्यापासून सरकारला कोण रोखलं आहे. तुमच्याकडे सैनिक आहे. का घेत नाही, असा सवाल केला आहे.

Pune News : गौरव आहूजाचा मित्र भाग्येश ओसवाल यालाही अटक

पुण्यात भर रस्त्यात अश्लिल कृत्य करणाऱ्या गौरव आहूजाला बेड्या पोलिसांनी ठोकल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ आता पोलिसांनी त्याचा भाग्येश ओसवाला यालाही ताब्यात घेतलं आहे. येरवडा पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची मेडिकल टेस्ट केली आहे. ज्यात अल्कोहोलचे प्रमाण आढळलं आहे.

Congress News : साताऱ्यात काँग्रेसला धक्का? उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर काँग्रेस सोडण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशा चर्चांना उत आला आहे. यामुळे काँग्रेससह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का मानला जातोय.

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्तेच्या निषेधार्थ बारामतीत आज (ता.9) सर्वधर्मीय निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. हा सर्वधर्मीय मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून याची सुरूवात बारामतीतील कसबा येथून होणार आहे. तर शेवट बारामतीतील नगरपालिके समोर होणार आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे उपस्थितीत असणार आहेत.

Ladki Bahini Yojana News : महायुती सरकारचा दे धक्का! यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजार लाडक्या बहिणी अपात्र

राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दे धक्का करत अपात्र ठरवले आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यातील 27 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून त्या कार, कर भरणारे आणि पती नोकरीवर असल्याच्या निकषांमुळे अपात्र ठरल्या आहेत.

Nitesh Rane News : औरंगजेबाजी कबरीचं काय होईल ते कळलेच : नितेश राणे

राज्यात सुरू झालेल्या औरंगजेब वादावरून खासदार उदयनराजे यांनी औरंगजेबची कबरच उखडून टाका, अशी मागणी केली होती. यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून महायुती सरकारला डिवचले होते. तर उदयनराजे यांची मागणी असेल तर सरकारने निर्णय घ्यावा असे म्हटले होते. यानंतर आता मंत्री मंत्री नितेश राणेंनी औरंगजेब कबरीवरून मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी ही कबर महाराष्ट्रात किती काळ राहील हे येणाऱ्या काही दिवसात दिसेलच. आमचं सरकार योग्य वेळी निर्णय घेईल आणि ब्रेकिंग न्यूज मिळेल असे म्हटलं आहे.

Ladki Bahini Yojana Maharashtra News : लाडकी बहीण योजनेचा एकच हफ्ता जमा

जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर लाडकी बहीण योजनेचे दोन हफ्ते जमा केले जातील असे अश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. पण लाडकी बहीण योजनेचा एकच हफ्ता जमा करण्यात आला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी टीका करणे सुरू केले आहे.

Beed Crime News : रक्षकच बनला भक्षक! बीडमध्ये महिला दिनीच तरुणीवरीवर बलात्कार, पोलिसाने केला अत्याचार

जागतिक महिला दिनीच बीड जिल्ह्यात तरुणीवर बलात्कार एका पोलिस कर्मचाऱ्याने केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे या कर्मचाऱ्याने तरूणीने आरडाओरड केल्यास चोरीचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या नराधम पोलिसाचे नाव ठाणे अंमलदार उद्धव गडकर असे आहे. गडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले. तर पीडितेला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.