पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अधिकृत यजमान होते. अर्ध्याहून अधिक सामने पाकिस्तानमध्ये खेळले गेले, परंतु भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले गेले, ज्यात अंतिम सामनाही समाविष्ट होता. मात्र, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचा बक्षीस वितरण समारंभ झाला तेव्हा पीसीबीचा कोणताही अधिकारी स्टेजवर उपस्थित नव्हता. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यावर नाराज आहे. तो म्हणला की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कोणीतरी प्रतिनिधी इथे असायला हवा होता. (Pakistan Cricket Board Champions Trophy controversy)
शोएब अख्तरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करुन त्याच्यी नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, मी एक विचित्र गोष्ट पाहिली आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कोणताही प्रतिनिधी येथे उभा नव्हता. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत होता आणि पाकिस्तानचा कोणताही प्रतिनिधी येथे उभा नव्हता. हे माझ्या समजण्यापलीकडे आहे, कोणीही प्रतिनिधित्व करण्यासाठी का आले नाही? कोणीही येथे ट्रॉफी देण्यासाठी का आले नाही? याबद्दल विचार करणे माझ्या मनाच्या पलीकडे आहे. हे जागतिक रंगमंच आहे, तुम्ही येथे असायला हवे होते, परंतु मला येथे कोणीही दिसले नाही याचे मला दुःख आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा किमान एक सदस्य येथे असायला हवा होता.” (Shoaib Akhtar on PCB Champions Trophy)
जर पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान असेल तर या समारंभात काही सदस्य उपस्थित असायला हवे होते. जरी पाकिस्तान संघातील कोणत्याही खेळाडूला कोणताही पुरस्कार मिळत नव्हता, तरी यजमान म्हणून त्यांची उपस्थिती तिथे असायला हवी होती. बीसीसीआय आणि आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी त्यात भाग घेतला. यामागे काय कारण होते? ही माहिती नंतर उघड होईल, पण निश्चितच पीसीबी अधिकारी येथे असायला हवे होते. पीसीबीचे अधिकारी जाणूनबुजून आले नाहीत का की आयसीसीने त्यांना बोलावले नाही? हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा-
रोहित-विराटचा अनोखा जल्लोष, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर दांडिया..!
75 वर्ष वय असलेल्या सुनिल गावसकरांचा भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ
तोंडावर पडले! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 4 वर्षांपूर्वी केलेलं भविष्य, आज सपशेल पडले तोंडावर