कॉलेज कट्टा
esakal March 10, 2025 10:45 AM

एस.बी.पाटील कॉलेज
एस.बी.पाटील कॉलेज आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन इन्स्टिट्यूटमध्ये ‘सकाळ’ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) क्लबची स्थापना करण्यात आली. एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थी युवकांनी गायन, वादन, नृत्य, अभिनय, फॅशन शो यांचे बहारदार प्रदर्शन केले. तसेच यावेळी क्रीडा स्पर्धाही घेण्यात आली. याप्रसंगी आर्किटेक्ट ऋतुराज कुलकर्णी (स्टुडंट डेव्हलपमेंट ॲण्ड प्रोग्रेशन हेड, एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर) यांना ‘सकाळ यिन मेंटॉर’ म्हणून गौरवण्यात आले. या कार्यक्रमास आयकॉनिक डिजाइनर ऑफ इंडिया ॲवॉर्ड विजेते आर्किटेक्ट प्रशांत देशमुख, सकाळ ‘यिन’ चे पिंपरी-चिंचवड शहर अधिकारी चेतन लिम्हण, डान्स इंडिया डान्स विजेते प्रथमेश माने आणि मिस इंडिया एशिया स्पर्धक मिस श्रद्धा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व कार्यक्रमाची धुरा प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुडंट्स कौन्सिल टीमने सांभाळली. लक्ष्मण तोरगले व किसन काळे यांनी महाविद्यालयातर्फे जबाबदारी सांभाळली. पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष डी.पी.लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव व्ही. एस.काळभोर, कोषाध्यक्ष एस .डी गराडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


औद्योगिक शिक्षण मंडळ
औद्योगिक शिक्षण मंडळातर्फे मराठी भाषा गौरव साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. दत्तात्रेय बाळसराफ, डॉ. विकास बरबटे, उपप्राचार्य डॉ.चंद्रशेखर सोनवणे यांनीही मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपआपले मत मांडले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल स्टडीजचे संचालक डॉ सुधाकर बोकेफोडे, कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स ॲण्ड इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललितकुमार कनोरे, डॉ. विकास बरबटे, उपप्राचार्य प्रा.सरिता गोयल आदी उपस्थित होते.


डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मास्टर्स ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशन अॅण्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. शाश्वत विकास म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय समतोल होय. या तीनही गोष्टींचा समतोल अत्यंत महत्वाचा आहे. या गोष्टी करायच्या असतील; तर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य होईल. यामध्ये स्वच्छ उर्जा, हरित उर्जा, अक्षय उर्जा या क्षेत्रांमध्ये उद्योजकांनी उद्योजकता दाखवावी, असे मत एंडुरंस टेक्नॉलॉजीचे कार्यकारी उपाध्यक्ष कल्याण पवार यांनी व्यक्त केले. यावेळी वर्ल्ड एम. कंपनीचे संचालक जस्पर फोर्च्युन, पोसको कंपनीचे चिरंजीव मैनी, विलो मॅथरच्या महाव्यवस्थापक (एचआर) कल्याणी कुलकर्णी, डॉ. डी.वाय. पाटील संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका (क्वालिटी अॅश्युरन्स )डॉ. श्वेता चव्हाण-पाटील, डी. वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्सचे संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम, सल्लगार संचालक प्रा. डी. आर. करुनूरे, कॉर्पोरेट रिलेशन्स प्रमुख डॉ. जयसिंग पाटील, डी.वाय. पीआयएमसीएच्या संचालिका डॉ. के. निर्मला, डी.वाय.पी. आयएमएसचे प्र. संचालक ललित प्रसाद आदी उपस्थित होते. परिषदेच्या उद्घाटन सत्राचे प्रा. मिनल वाघ यांनी सूत्रसंचालन केले; तर प्रा. डॉ. अविनाश पवार यांनी आभार केले.


एम.आय.टी. कॉलेज
आळंदी येथील एम.आय.टी. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजमध्ये गुगल डेव्हलपर ग्रुप्सने युथ हॅकेथॉन आयोजित केले. या स्पर्धेसाठी एकूण ३२ समस्या, विधाने तसेच एक ओपन इनोव्हेशन डोमेन उपलब्ध करून देण्यात आले. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना प्रोटोटाइप सादरीकरणाच्या माध्यमातून मांडल्या. या एकदिवसीय हॅकेथॉनमध्ये एकूण ५४ संघांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये विविध संस्थांमधून एकूण १८१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. स्पर्धकांनी कल्पना परीक्षकांसमोर मांडल्या. या हॅकाथॉनमध्ये डॉ. संकेत लोढा आणि दीपक कडवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यामध्ये संचेत कोळेकर (तांत्रिक संघ प्रमुख), रामेश्वर मते (व्यवस्थापन संघ प्रमुख), रोहन काटकर (डिझाईन संघ प्रमुख) आणि गणेश गुंठाळ (सामग्री व सीआर संघ प्रमुख) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कार्यक्रमाचे नेतृत्व वृशाली पुंडे (चॅप्टर ऑर्गनायझर) यांनी केले. तसेच प्राध्यापक हर्षा पाटील आणि अश्विनी सातकर यांचे समन्वयक म्हणून मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. सुनील महाजन, संचालक डॉ. बी. बी. वाफारे यांचे मार्गदर्शन लाभले.

इ-बाहा स्पर्धा
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स यांच्यावतीने हैद्राबाद येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील इ-बाहा स्पर्धेत आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीम प्रिडिएटर्स रेसिंग या संघाने अव्वल क्रमांक पटकाविला. विजेतेपदासह विद्यार्थ्यांनी बनविलेल्या गाडीस स्पर्धेतील विविध १० विभागांतील बक्षिसे मिळाली. विशेषत: टीम प्रिडिएटर्स रेसिंग संघाने सर्वोत्तम संघासह ७ विभागांत प्रथम क्रमांक मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. देशभरातील नामवंत ७५ अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून आकुर्डीतील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपदासह इतर विभागातील प्रथम सात क्रमांकाची बक्षिसे मिळवली. या स्पर्धेत संघाचे व्यवस्थापन खोयना सचदेव हिने केले. संघाचे नेतृत्व शुभम मोहिते याने; तर चालक ही भूमिका जयेश सैंदाणे याने पार पाडली. टीम प्रिडिएटर्स संघाचे उपकप्तानपद अथर्व वारके याने सांभाळले. टीम प्रिडिएटर्स या विजयी संघात शुभम मोहिते, जयेश सैंदाणे, खोयना सचदेव, अथर्व वारके, यश महाजन, पृथ्वीराज जाधव, संकेत भंडारे, संकेत घाडगे, श्रेयेश धायगुडे, दीप पवार, योगेश माने, मंगेश राठोड, मेव्हीत सलदान्हा, गौरव पांचाळ, अदित्य परदेशी, प्रसाद उबाळे, गौरांग कऱ्हाळे, शुभम चौधरी, समर्थ केसरकर, हर्षवर्धनसिंह परदेशी, निलेश दिशागत, कौस्तव बाग, अथर्व क्षीरसागर, पियुष पाईकराव, धर्मराज गाडे, विवेक शेलार, सान्वी पाटील, प्रियांशु विधाते या विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पी. मालती, डीन ऍडमिनिस्ट्रेशन डॉ. संदीप सरनोबत, तांत्रिक विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण नितनवरे, टीम प्रिडिएटर्स रेसिंग संघाचे शिक्षक समन्वयक प्रा. वैभव फुले यांचे या यशासाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले.


अरविंद तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल
डॉ. अरविंद ब. तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कोस्टल कलिनरी फूड फेस्टिव्हलमधून कोकण, इंडोनेशिया आणि थायलंड येथील संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. विद्यार्थ्यांनी केलेला शेवटचा रॅम्प वॉक लक्षवेधी ठरला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद पाटील, हॉ. कॉनरॉडचे महाव्यस्थापक अभिषेक सहाय, रॅडिसन हॉटेलचे महाव्यवस्थापक पंकज सक्सेना, कॅम्प एजुकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, उपाध्यक्ष यु. टी. पुंडे, सचिव बी. व्ही. जवळेकर, खजिनदार एस. डी. अगरवाल, सदस्य डॉ. आय. एस. मुल्ला, प्राचार्य. डॉ. अजयकुमार राय आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी परिधान केलेला विविध प्रांतीय पोशाख, सर्वत्र केलेल्या सजावटीमुळे खरोखरच कोस्टल फूडचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक कोकणी नृत्य सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. त्यामध्ये कोकण, इंडोनेशिया आणि थायलंड येथील पारंपारिक वेशभूषा केलेला रॅम्प वॉक प्रथम व तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले. तसेच तृतीय वर्षातील राहुल या विद्यार्थ्याने फ्लाईरोलॉजी सादर केले. प्रास्ताविक डॉ. अजयकुमार राय यांनी केले. प्राची कोल्हे, शिफा सिंग यांनी सूत्रसंचालन केले. तर वेदांत हिरेमठ यांनी आभार मानले.

जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपला भेट
ताथवडेमधील जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय येथील कॉम्प्युटर सायन्स आणि बिझनेस सिस्टीम मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) नारायणगाव पुणे येथे भेट दिली. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सर्व नागरिक, शाळा, महाविद्यालयांना भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. विद्यार्थ्यांनी तेथील रेडिओ खगोलशास्त्र, रिसीव्हर तंत्रज्ञान तसेच वेगवेगळे सर्वोत्तम विज्ञान प्रयोग समजून घेतले. संस्थेमधील शास्रज्ञांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून खगोलशास्त्राची माहिती दिली. भविष्यात शास्त्रज्ञ होण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहित केले. यावेळी संस्थेचे थोरात यांचे महाविद्यालयाच्यावतीने प्राध्यापक विद्याश्री कोकणे, कविता पाटील, नीरज साठवणे, निलेश पिंजरकर यांनी आभार मानले. विभागप्रमुख डॉ. कविता मोहोळकर यांनी मार्गदर्शन केले.

संघवी केशरी महाविद्यालय
संघवी केशरी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात फनी गेम, उद्योजकता विकास, पारंपरिक वेशभूषा सादरीकरण आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रा. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया, सहाय्यक सचिव (श्री जैन विद्या प्रसारक मंडळ) आणि संस्थेचे मानद कार्यकारी अधिकारी खंडू खिलारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सतीश पवार, प्रा. प्रवीण जावीर (मराठी विभाग प्रमुख) यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ झाला. यामध्ये पाककला, उद्योजकता विकास, वेशभूषा सादरीकरण, रांगोळी इत्यादी साठी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी पूजा विभुते, सागर बर्वे, राजवीर सिंग शेखावत, साक्षी घरमोडे, सागर खंदारे, आदित्य गायकवाड, सौरभ धावारे, महेश देशमुख आणि रवी कांबळे यांना विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अभिषेक आकणकर आणि प्रा. अविनाश कदम यांनी केले. व्यवस्थापन विभागाच्या प्रा. प्राजक्ता फलके यांनी सूत्रसंचालन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.