ही तर गुंतवणुकीची योग्य वेळ!
esakal March 10, 2025 11:45 AM

मुकुंद लेले

शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेचा सामना कसा करायचा, अतिरिक्त रक्कम गुंतवायची की नाही आणि गुंतवणूक करायची असेल, तर कुठे करावी, असे प्रश्न आज गुंतवणूकदारांच्या मनात येत आहेत. या पार्श्वभूमीवर, आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे (एएमसी) मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील यांच्याशी केलेल्या बातचितीचा सारांश.

अर्थव्यवस्थेचे आणि बाजाराचे तीन प्रमुख बाबींमधून विश्लेषण करावे लागेल.

मूलभूत बाजार आणि आर्थिक दृष्टिकोन
  • ‘फेड’ने दरांवर ‘हॉकिश पॉझ’ कायम ठेवला आहे.

  • जागतिक अनिश्चिततेमुळे डॉलर अजूनही मजबूत आहे.

  • मजबूत डॉलर रुपयासह उगवत्या बाजारांतील चलनांवर दबाव आणत आहे.

  • ‘जीडीपी’ वाढीचा वेग मंदावला आहे. परंतु, २०२५ मध्ये आर्थिक धोरणे सुलभ होतील आणि अर्थव्यवस्थेत सुधारणा होऊ शकेल.

  • ग्रामीण भागातील मागणीत सुधारणेची चिन्हे दिसत आहेत. परंतु, शहरी मागणी संथ आहे.

तांत्रिक आणि भावनिक ट्रेंड
  • प्रथमच ‘एसएमआयडी’मध्ये मोठी दुरुस्ती दिसते. हेडलाइन एसएमआयडी इंडेक्स १२-१६ टक्के कमी आहे, तर ‘एनएसई ५००’चे सुमारे ५० टक्के शेअर त्यांच्या उच्चांकांच्या ३० टक्के कमी आहेत.

  • दुसरे म्हणजे आपल्या ५० दिवस आणि २०० दिवस ‘मूव्हिंग ॲव्हरेज’च्या वर व्यवहार करणाऱ्या शेअरची टक्केवारी आता कमी झाली आहे. ‘निफ्टी ५००’चे ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेअर त्यांच्या २०० दिवसांच्या ‘मूव्हिंग ॲव्हरेज’पेक्षा कमी असतात तेव्हा बाजारपेठ सामान्यतः तळाला गेलेली असते. आपण त्या पातळीच्या जवळ आहोत.

  • २०२२ च्या मध्यापासून प्रथमच ‘प्रोप्रायटरी कॉम्पोझिट सेंटिमेंट इंडिकेटर’ (‘मॉर्गन स्टॅन्ले रिसर्च’मधून) ‘ओव्हरसोल्ड’ टप्प्यात गेला आहे. त्यामुळे संभाव्य वाढ आणि खरेदीचा इशारा दिला गेला आहे.

रोख प्रवाह : एफआयआय आणि देशांतर्गत प्रवाह
  • भारताचे ‘एफपीआय’ स्थान दशकातील सर्वांत कमी स्थानावर आहे. त्यामुळे बाह्य प्रवाह वाढण्याची शक्यता दिसत नाही.

  • ‘एसआयपी’चा प्रवाह कायम आहे, परंतु बाजारातील सध्याच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सावध झाल्याचे दिसते. मोठा धोका असलेल्या शेअरच्या तुलनेत कमी अस्थिर शेअरवर भर दिला जाईल, अशी चिन्हे आहेत.

बाजार काय सांगतो?
  • दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही खरेदीची संधी आणि गुंतवणुकीची वेळ आहे.

  • चिंतेची अनेक कारणे आता मागे पडली आहेत आणि त्याचा प्रभाव संपला आहे. भारताची दीर्घकालीन मूलभूत तत्त्वे मजबूत आहेत.

  • बाजारातील घसरण ही टप्प्याटप्प्याने भांडवल गुंतवण्याची संधी देते.

  • नजीकच्या काळातील अनिश्चितता मोठी राहील. परंतु, ‘निफ्टी’साठी ‘रिस्क’ आणि ‘रिवॉर्ड’ सुधारत असल्यामुळे मध्यम कालावधीत वाजवी परतावा मिळू शकेल.

  • २०२५ च्या मध्यावर एकत्रीकरण सुरू राहील आणि त्यानंतर ‘ब्रेकआऊट रॅली’ येईल. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत एकरकमी गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणे योग्य ठरेल.

  • ‘एसआयपी’ गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक कायम ठेवावी आणि सध्याच्या बाजार पातळीवर जास्त युनिट जमविण्याचा लाभ घ्यावा; तसेच ‘एसआयपी’ टप्प्याटप्प्याने वाढविण्याचाही विचार करावा.

गुंतवणूक कुठे करणे योग्य ठरेल?
  • ‘एसटीपी’साठी लार्ज कॅप वा फ्लेक्सी कॅप फंडांचा विचार करावा.

  • एकरकमी गुंतवणुकीसाठी मल्टी-ॲसेट ॲलोकेशन आणि बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड अशा योजनांना प्राधान्य द्यावे.

  • सोने-चांदी ः यंदा १०-१२ टक्के परतावा अपेक्षित. यातील गुंतवणुकीमुळे जागतिक अनिश्चिततेवर मात करता येऊ शकेल.

    (डिस्क्लेमर : शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे हिताचे ठरते.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.