Champions Trophy and IIT Baba : महाकुंभपासून सतत चर्चेत असलेला आयआयटीयन बाबा उर्फ अभय सिंह याने आता भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर दोन पोस्ट टाकल्या आहेत. यापूर्वी IIT बाबाने पाक आणि भारत क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा विजय होईल अशी भविष्यवाणी केली होती,त्यानंतर भारत मात्र जिंकला होता. त्यानंतर आयआयटीयन बाबाला चांगलेच रोस्ट केले होते. त्यानंतर एका खाजगी टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात या बाबाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. आता न्युझीलंड आणि भारत यांच्या सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर आयआयटीयन बाबाने एक पोस्ट व्हायरल केली आहे.
महाकुंभपासून चांगला व्हायलर झालेला आयआयटीयन बाबा उर्फ अभय सिंह याच्याबद्दल इंटरनेटवर बरेच काही व्हायरल होत आहे. पवई आयआयटीमधून उत्तीर्ण झालेला हा बाबा अचानक अध्यात्माकडे वळल्याने त्याला सुहानूभूती देखील मिळत आहे. तर मध्येच तो त्याच्या चित्रविचित्र भविष्यवाणीमुळे वादग्रस्त ठरला आहे. त्याने आता चॅम्पियन ट्रॉफी २०२५ मध्ये भारत आणि न्युझीलंड अंतिम सामन्याबद्दल देखील आपली मते पोस्ट केली आहेत.
भारत आणि न्युझीलंड दरम्यान आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम मुकाबला रंगतदार झाला. ही अंतिम मॅच जिंकून भारताने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. आयआयटी बाबाने आपल्या इंस्टाग्रामवर या संदर्भात स्टोरी टाकल्या आहेत. या स्टोरीवर युजर्स केवळ रिप्लायच करू शकतात. कारण या पोस्ट नसल्याने युजर त्यावर कमेंट करु शकत नाहीत. भारताने २०१३ नंतर एकूण १२ वर्षांनंतर चॅम्पियन ट्ऱॉफी आपल्या नावावर केली आहे.त्यामुळे देशभर उत्साहाचे वातावरण आहे.
IIT बाबाने गेल्या काही दिवसांपूर्वी २३ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या मॅच संदर्भात भारताच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती.परंतू विराट कोहली यांच्या शतकामुळे भारताला या सामन्यात मोठा विजय मिळाला होता. त्यानंतर आयआयटीयन बाबावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे.त्यानंतर आयआयटीयन बाबाने सपशेल माफी मागितली होती.
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान संदर्भात आयआयटी बाबाची भविष्यवाणी चुकीचा सिद्ध झाल्यानंतर त्याने स्पष्टीकरण दिले होते. ज्यात त्याने म्हटले होते की आम्ही तर असेच खेळतो, आम्ही आमच्यासाठी खेळतो. कधीही कोणत्याच प्रेडिक्शन आणि विडिक्शनवर विश्वास ठेवायलाच नको. आपल्या डोक्याचा वापर करा असे आयआयटीयन बाबाने म्हटले होते.
आयआयटी बाबाने आपल्या Instagram हँडल @kalkiworld777 तीन स्टोरी शेअर करीत भारताच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पहिल्या स्टोरीत त्याने एक रिल्स शेअर करीत त्यांनी टीम इंडियाच्या विनिंग मोमेंटवर ये चॅम्पियन की टीम आहे, बधाई हो भारत असे म्हटले आहे.
अभय सिंह याचे इंस्टाग्राम अकाऊंट येथे पाहा –
अभय सिंह याने एक स्टोरी टाकली असून त्यात लिहीलेय की , ‘जीत का रंग तो चढ़ गया, अब गुलाल का रंग चढ़े या न चढ़े, फर्क नहीं पड़ता’ तर आयआयटीयन बाबाच्या तिसऱ्या स्टोरीत त्याने एक व्हिडियो शेअर केला आहे, ज्यात एक महिला हातात भारताचा झेंडा उंचावून भारताचा हा विजय साजरा करताना दिसत आहे.