मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्याच्या अर्थसंकल्पात काय मिळणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. याचे उत्तर आता मिळाले आहे. या योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज महाराष्ट्राचा महाबजेट मांडला आहे. यात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच लाडक्या बहिणींसाठीही आनंदाची बातमी दिली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील २ कोटी ५३ लाख महिलांना जुलै महिन्यापासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. तर २०२५-२६ मध्ये या योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
तर योजनेतून मिळणाऱ्या पैशांचा वापर काही महिला गटांनी वीज भांडवलासाठी केला आहे. अशा महिलांना आणखी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार, असल्याची घोषणा या करण्यात आली आहे.