Mental Health Tips : रोज एक संत्री खा, डिप्रेशनला दूर ठेवा
Marathi March 11, 2025 04:25 AM

आजकालची जीवनशैली पाहता शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक आरोग्यालादेखील प्राधान्य देणे गरजेचे झाले आहे. वाढत्या कामाचा व्याप, दैनंदिन सवयी, खाण्यापिण्याच्या बदलत्या वेळा आणि अनियोजित दिनचर्या अशा अनेक कारणांमुळे ताण- तणाव वाढू शकतो. अशावेळी डिप्रेशनमध्ये जाण्याचा धोका असतो. म्हणून तज्ञ सांगतात की, आपल्या नियमित आहारात एका संत्र्याचा समावेश करा. संत्र एक सुपरफूड आहे. ज्यात विविध न्यूट्रिएंट्सचा समावेश असतो. या फळाचे नियमित सेवन केल्यास हॅपी हार्मोन्सची निर्मिती होते आणि यामुळे डिप्रेशनचा धोका 20 टक्क्यांपर्यंत कमी होतो. (Mental Health Tips Daily Consumption Of Orange Can Reduce Depression)

पोषण

संत्र हे एक असं फळ आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन C, A आणि B यांसह कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचासुद्धा समावेश आहे.

संत्र्याचे इतर फायदे

संत्र खाल्ल्याने डिप्रेशनचा धोका कमी होण्यासोबत इतर अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ज्याविषयी जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

1. चिरतरुण त्वचा

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. शिवाय मुरुमांची समस्या कमी होते आणि डागांपासून मुक्ती मिळते. परिणामी, बऱ्याच काळासाठी तुमची त्वचा तेजस्वी आणि चमकदार राहू शकते.

2. रोगप्रतिकार क्षमतेत वाढ

संत्र्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकार क्षमतेत वाढ होते. ज्यामुळे हंगामी फ्लू, बॅक्टेरिया आणि संक्रमणांशी लढण्यास आपल्या शरीराला मदत होते.

3. हृदयाची काळजी

आपल्या हृदयाचे आरोग्य उत्तम राखायचे असेल तर संत्र जरूर खा. कारण या फळात पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. जे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास सहाय्यक ठरतात.

4. मजबूत हाडे

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे महत्वाचे पोषक घटक असतात. जे आपल्या शरीराला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास मदत करतात. शिवाय रोज संत्री खाल्ल्याने हाडे निरोगी आणि मजबूत होण्यास मदत होते.

हेही पहा –

Benefits of Silver utensils : चांदीच्या भांड्यात जेवणाचे फायदे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.