डोंबिवलीत चौधरी वाडा मैदानात आरएसएसच्या वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली होती. रात्रीच्या सुमारास काही लहान मुलं शाखेत प्रशिक्षण घेत होते. यादरम्यान काही अज्ञातांकडून वीर सावरकर शाखेवर दगडफेक करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून ५ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामधील ४ जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे.
डोंबिवली पूर्वेतील चौधरीवाडा मैदानावर संघाचे वीर सावरकर शाखा आहे. या शाखेत काही मुलांना प्रशिक्षण देण्यात येत होते. ९ मार्चला काही अज्ञातांनी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना शाखेवर दगडफेक केली. जंगलातून आणि शेजारील इमारतीतून काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती आहे.
दगडफेकीनंतर काही लहान मुले घाबरले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे ५ जणांना ताब्यात घेतले. यामधील चार जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.
दगडफेकीनंतर आरएसएसचे कार्यकर्ते संतापले. आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. या घटनेनंतर पोलिसांनी शाखेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त केला.