वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या पर्वातील (WPL 2025) साखली फेरीतील 20 व्या आणि शेवटच्या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरुची कर्णधार आणि स्फोटक सलामीवीर स्मृची मंधाना हीने मुंबई इंडियन्स विरुद्ध झंझावाती खेळी केली आहे. स्मृतीने मुंबईविरुद्ध अर्धशतक झळकावलं. स्मृतीने या खेळीसह बंगळुरुला 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 199 धावांपर्यंत पोहचवण्यात प्रमुख भूमकिा बजावली. तसेच स्मृतीने बॅटिंगने वैयक्तिरित्या या हंगामाचा अविस्मरणीय असा शेवट केला.
स्मृतीने 37 बॉलमध्ये 143.24 च्या स्ट्राईक रेटने 53 रन्स केल्या. स्मृतीने या खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. स्मृतीने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 9 बॉलमध्ये 42 रन्स केल्या. स्मृतीने 3 षटकार आणि 6 चौकार लगावले. स्मृतीव्यतिरिक्त बंगळुरुच्या इतर चौघींनीही अप्रतिम बॅटिंग केली.
स्मृती आणि सभिनेनी मेघना या सलामी जोडीने 41 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृतीने दुसर्या विकेटसाठी एलिसा पेरीसह 59 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर स्मृती 53 धावा करुन माघारी परतली. त्यानंतर एलिसा आणि रिचा घोष या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 50 पेक्षा अधिक धावा जोडल्या. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली.
रिचा घोष हीने स्फोटक खेळी केली. रिचा आऊट झाली, मात्र तिने केलेल्या वादळी खेळीमुळे बंगळुरुला बूस्टर मिळाला. रिचाने 22 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्स लगावला. त्यानंतर एलिसा पेरी आणि जॉर्जिया वेरेहम या दोघींनी शेवटच्या 16 बॉलमध्ये 46 रन्स केल्या. बंगळुरुने अशाप्रकारे 199 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबईला 200 धावांचं आव्हान मिळालं. एलिसा पेरी हीने नाबाद 49 धावा केल्या. तर जॉर्जिया वेरेहमने 10 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 310 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 31 रन्स केल्या.
मुंबई इंडियन्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि पारुनिका सिसोदिया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सभिनेनी मेघना, स्मृती मंधाना (कर्णधार), एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, हेदर ग्रॅहम, स्नेह राणा, किम गर्थ, प्रेमा रावत आणि जोशिता व्ही.जे.