Jalgaon News : पोटच्या लेकाचा बर्थडे ठरला अखेरचा, त्याच पोराच्या डोळ्यासमोर बाप रेल्वेखाली; काळीच चिरणारी घटना
Saam TV March 12, 2025 01:45 AM

जळगाव : जळगाव येथील रावेर तालुक्यात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रावेर येथे जाण्यासाठी कामयानी एक्स्प्रेसमध्ये चढताना तोल गेला आणि चाकाखाली आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनिल जाधव असं या व्यक्तीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी सासुरवाडीला मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाधव परिवार आले होते. त्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

वर चालत्या रेल्वे चढत असताना तोल गेल्याने एका ३९ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. मंगळवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अनिल जाधव हे रावेर शहरात पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत राहत होते. मजूरीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासुरवाडीला पत्नी आणि मुलासोबत आलेले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी १० मार्च रोजी रात्री ९ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर रावेर येथे जाण्यासाठी आले होते.

मध्ये चढत असताना त्यांचा तोल गेल्याने ते रेल्वेखाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.