आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी असलेल्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याबाबत एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.. आयपीएल सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला दुखापत झाली आहे. त्याच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं आहे. राजस्थान रॉयल्सने द्रविडचा एक फोटो पोस्ट केला आहे. यात त्याच्या पायाला दुखापत झाल्याचं दिसत आहे. राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविडच्या दुखापतीबद्दल माहिती देताना राजस्थान रॉयल्सने इंस्टाग्रामवर लिहिले की, बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना दुखापत झालेले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड वेगाने बरे होत आहेत. ते बुधवारी जयपूरमध्ये संघात सामील होतीलल.
राहुल द्रविडने यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यामुळे राहुल द्रविड महत्त्व फ्रेंचायझीला माहिती आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर द्रविड आयपीएलपासून दूर होता. पण टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर प्रशिक्षकपद सोडलं आणि पुन्हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासोबत ज्वॉइन झाला आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राजस्थानकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. कारण राजस्थानने शेवटचा चषक 2008 मध्ये जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत झोळीत काहीच आलं नाही. राहुल द्रविड दोन हंगाम प्रशिक्षक म्हणून राजस्थानसोबत होता. पण 2016 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) मध्ये गेला.
राजस्थान रॉयल्स यंदाही संजू सॅमसनच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. पण यावेळी संघात मेगा लिलावानंतर बदल झाले आहेत. जोस बटलर आता गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. त्यामुळे नवा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं राहिल.
राजस्थान संघ: संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महिष तीसखान, वनिंदू हसरंगा, आकाश माधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, युद्धवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, कुणाल राठोड, अशोक शर्मा.