आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक फॅन बेस असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अजून एकही जेतेपद मिळालेलं नाही. पण दरवेळी त्याच प्रतीक्षेत संघ आपली कामगिरी करत असतो. आता आयपीएलच्या 18व्या पर्वात ही प्रतीक्षा पूर्ण होणार का? याकडे लक्ष लागून आहे. आरसीबी संघ या पर्वात रजत पाटीदारच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून सराव शिबिराचे आयोजन केलं असून सराव सुरु झाला आहे.कोहलीच्या अनुपस्थितीत आरसीबीने उर्वरित खेळाडूंसोबत सराव सुरू केला होता. आयपीएल स्पर्धेची सुरुवात 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होईल. असं असताना विराट कोहलीने शिबिरात एन्ट्री मारली आहे. पहिल्या सामन्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक असताना किंग कोहली रेड आर्मीमध्ये सामील झाला आहे. आरसीबी फ्रँचायझीने त्यांच्या सोशल मीडियावर आगमनाचा व्हिडिओ शेअर केला.
चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडियासोबत दुबईमध्ये असलेला विराट कोहली काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता. पण आरसीबीच्या सराव शिबिरात गैरहजर राहिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीने उत्तम फॉर्ममध्ये खेळला. त्याने पाच सामन्यांमध्ये 54.50 च्या सरासरीने 218 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट होते. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद शतक झळकावले आणि संघाला विजय मिळवून दिला. यानंतर, कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात 84 धावा करत पुन्हा संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
फलंदाज: विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक छिकारा अष्टपैलू: लियाम लिव्हिंगस्टोन, कृणाल पांड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मनोज भंडागे, जेकब बेथेल गोलंदाज: जोश हेजलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, यश दयाल