उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी कुठल्या रंगाचा माठ चांगला
Webdunia Marathi March 16, 2025 07:45 PM

उन्हाळा वाढत आहे. दररोज दुपारी उन्हाचा तडाखा जाणवतो. उन्हाळ्यात बाहेर फिरताना घसा कोरडा होतो.

सामान्य लोकांच्या घरात रेफ्रिजरेटर असून देखील वडीलधारी उन्हाळ्यात मातीच्या माठातून पाणी पिण्याचा सल्ला देतात. या साठी उन्हाळ्यात घराघरात माठ ठेवले जाते. बाजारात विविध प्रकारचे मातीचे माठ मिळतात. लाल आणि काळे रंगाचे माठ बाजारात विक्रीसाठी येतात. हे माठ पाण्याला थंड करतात.पण बऱ्याच लोकांना माहिती नसते कि

कोणत्या रंगाचा माठ खरेदी करावा. कोणत्या रंगातील माठाचे पाणी सर्वात जास्त थंड असते.

ALSO READ:

सिरॅमिक माठ -

या माठ्यातील पाणी थंड होण्यासाठी वेळ लागतो. या मुळे या माठेला उन्हाळ्यात जास्त मागणी नसते. याचे डिझाईन लोकांना आकर्षित करते.

लाल मातीचे माठ -

या माठ्यातील पाणी सिरेमिक भांड्यापेक्षा लवकर थंड होते आणि काळ्या मातीच्या माठा च्या तुलनेत खूप कमी विलंबाने थंड होते. जिल्ह्यात या माठाला मोठी मागणी आहे.

ALSO READ:

काळ्या मातीचे माठ -

या माठ्यातील पाणी लवकर थंड होते. हे भांडे काळ्या मातीपासून एका अनोख्या पद्धतीने बनवले आहे. काळे रंग असूनही, त्याचे पाणी इतर माठाच्या तुलनेत लवकर थंड होते.


काळ्या मातीचे माठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले. पाणी थंड करण्यात लाल मातीचे माठ दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे, सिरेमिक माठ्यातील पाणी थंड होण्यासाठी सर्वात जास्त वेळ लागला.

सिरेमिक माठ: बाजारात सिरेमिक माठ 250 ते300 रुपयांना विकला जात आहे. जर कलाकृती कोरलेली असेल तर त्याची किंमत हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

ALSO READ:

काळ्या मातीचे माठ: कमीत कमी 100-150 रुपयांना उपलब्ध. या भांड्याला सर्वाधिक मागणी आहे.

लाल मातीच्या माठाची किंमत: लाल मातीच्या माठाची किंमत देखील काळ्या मातीच्या भांड्याइतकीच असते. हा माठ बाजारात 100ते 150रुपयांना मिळतो.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.