आयपीएलच्या 18 व्या मोसमाची (IPL 2025) क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत लीग असा लौकीक असलेल्या स्पर्धेतील 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या स्पर्धेच्या इतिहासातील 2 यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हे संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उत्सूकता आहे. मात्र या सामन्याआधी मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा चांगला संतापलाय.सीएसकेचं नाव ऐकताच हिटमॅन रागाने लालबुंद झाला. रोहितने चेन्नईचं नाव ऐकताच हातातल्या हातात काचेचा ग्लास फोडला.
मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्यासाठी आतापासूनच वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी बॉडकास्टर्सने एक प्रमोशनल व्हीडिओ बनवला आहे. या प्रमोशनल व्हीडिओत रोहित शर्मा आणि मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आहेत. दोघेही एका हॉटेलमध्ये बसले आहेत. “आपला पहिला सामना केव्हा आहे?” रोहित असा प्रश्न हार्दिकला करतो. त्यानंतर हार्दिक वेटरला आवाज देतो आणि रविवार सीएसके, असं म्हणत रोहितला उत्तर देतो. इतकं ऐकताच रोहित संतापतो. त्यानंतर रोहित हातातच ग्लास फोडतो. त्यानंतर हार्दिक वेटरला हसत टेबल साफ करायला सांगतो.
दरम्यान चेन्नई आणि मुंबई या 18 व्या मोसमात एकमेकांविरुद्ध एकूण 2 वेळा भिडणार आहे. चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात 23 मार्च रोजी होणार सामना हा चेपॉक स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर त्यानंतर जवळपास महिन्यानंतर पुन्हा आमनेसामने असणार आहेत. उभयसंघात 20 एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
रोहितने ग्लास फोडला
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह घझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, कॉर्बिन बॉश आणि अश्वनी कुमार.
चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, मथीशा पथिराणा, शिवम दुबे, आर अश्विन, डेवन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुड्डा, गुरजपनीत सिंह, नाथन एलिस, जेमी ओवर्टन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ, वंश बेदी आणि श्रेयस गोपाळ.