Georai Accident : समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या आपघातात एक ठार व एक गंभीर जखमी, गेवराईतील दुर्दैवी घटना
esakal March 17, 2025 01:45 AM

गेवराई : दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या आपघातात एक ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री पाथर्डी-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या जवळील भेंडटाकळी रस्त्यावर घडली.

नामदेव भानुदास कारके(वय ६०)रा.जातेगाव ता.गेवराई जि.बीड असे या अपघातातील मृताचे नाव आहे. काल नामदेव कारके हे वडवणीहून गाव जातेगाव कडे दुचाकीवरुन नाथापूर-भेंडटाकळी रस्त्यावरून परतत असताना पाथर्डी-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर काही अंतरावर असताना समोरील भरधाव वेगातील दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने नामदेव कारके हे जागीच ठार झाले.

तर जांभळी तांडा येथील राहुल जाधव (वय २२)गंभीर जखमी झाला. घटनास्थळावर तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.घटनेची पंचनामा करुन मृत नामदेव कारके यांचा मृतदेह जातेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास पाठविण्यात आला.तर जखमी राहुल जाधव यास बीड जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.