टिव्हीची लोकप्रिय मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. चाहते या मालिकेचे नवीन पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ती मालिका आता पुन्हा एका नव्या जोशात आणि नवीन कथा घेऊन लवकरच प्रवेशकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून सर्वांची आवडती 'देवमाणूस' आहे.
'' (Devmanus ) मालिका आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे. या मालिकेचा नवीन अध्याप अधिकच भन्नाट असणार आहे. नुकतीच 'झी मराठी'ने 'देवमाणूस' तिसऱ्या भागाची घोषणा केलेली आहे. याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते मालिकेसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
मालिकेची घोषणा करणाऱ्या व्हिडीओला एक खास कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये असे लिहिलं आहे की,"मधला अध्याय सुरू होणार घरोघरी...'देवमाणूस' परत येतोय खबर आहे खरी!" मालिकेच्या पहिल्या टीझरमध्ये अभिनेत्याची फक्त सावली दिसत आहे. मुख्य भूमिकेतून पुन्हा एकदा गायकवाड पाहायला मिळणार अशी सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कारण हा व्हिडीओ किरण गायकवाड याने देखील इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
'देवमाणूस' मालिकेच्या आधी दोन भागात खेड्यातील डॉक्टरची कथा दाखवण्यात आली होती. खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि तो देवमाणूस कसा त्यांचा फायदा घेतो हे चित्रण त्यात पाहायला मिळते. 'देवमाणूस' मालिकेच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला होता. 'देवमाणूस' मालिकेची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते.
मालिकेतील 'देवमाणूस' म्हणजे किरण गायकवाडने (Kiran Gaikwad) तर आपल्या भूमिकेने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'देवमाणूस' मालिकेमुळे किरणला खूप लोकप्रियता मिळाली. मात्र आता नवीन सुरू होणाऱ्या 'देवमाणूस' मालिकेच्या नव्या अध्यायात कोण कलाकार पाहायला मिळणार याची अद्याप घोषणा झाली नाही. तसेच मालिकेची रिलीज डेटही समोर आली नाही.