Latest Maharashtra News Updates : कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन, 200 हून जास्त बैलगाडी चालकांचा सहभाग
esakal March 17, 2025 04:45 AM
Sangli Live : कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन 200 हून जास्त बैलगाडी चालकांचा सहभाग

सांगलीच्या कासेगाव मध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आला आहे.पाच लाख रुपयांचा पहिलं बक्षीस,बैलगाडी शर्यतीच्या मैदानासाठी ठेवण्यात आले असून यामध्ये मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून सुमारे दोनशेहून अधिक बैलगाडी चालक सहभागी झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद लाहिगडे फाउंडेशनच्यावतीने या भव्य बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे.

CM Devendra Fadnavis Live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले 'संत तुकाराम वैकुंठ गमन मराठी ॲनिमेशन कथा' ॲनिमेशन फिल्मचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने कैवल्य यु ट्यूब चॅनेलवर लहान मुलांसाठी 'संत तुकाराम वैकुंठ गमन मराठी ॲनिमेशन कथा' या विशेष ॲनिमेशन फिल्मचे अनावरण केले.

Amit Shah Live Update: भारत सरकार संपूर्ण कराराची अंमलबजावणी करेल आणि त्यानंतर, बीटीआर क्षेत्रात दीर्घकालीन शांतता राहील - अमित शाह

ऑल बोडो स्टुडंट्स युनियन (एबीएसयू) च्या ५७ व्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात, "हा महत्त्वाचा कार्यक्रम बोडोलँडमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचा खूप मोठा संदेश देतो. २७ जानेवारी २०२० रोजी, जेव्हा बीटीआर (बोडोलँड टेरिटोरियल रीजन) शांतता करारावर स्वाक्षरी झाली, तेव्हा काँग्रेसने माझी खिल्ली उडवली की बोडोलँडमध्ये कधीही शांतता राहणार नाही आणि हा करार विनोद बनेल. आज, कराराच्या ८२% अटी आसाम आणि दिल्ली सरकारांनी अंमलात आणल्या आहेत... पुढील २ वर्षांत, भारत सरकार संपूर्ण कराराची अंमलबजावणी करेल आणि त्यानंतर, बीटीआर क्षेत्रात दीर्घकालीन शांतता राहील. १ एप्रिल २०२२ रोजी, आम्ही संपूर्ण बीटीआर क्षेत्रातून एएफएसपीए काढून टाकला आहे. आज, दिल्लीच्या हॉटेलमध्ये, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अंतर्गत बोडोलँडमधील कोक्राझारचा मशरूम प्रत्येकाच्या जेवणाचा भाग बनला आहे; हे घडले कारण येथे शांतता आहे. बोडोलँडने ड्युरंड कपचे आयोजन देखील केले. मध्ये २०३६ मध्ये अहमदाबादमध्ये ऑलिंपिक होणार आहे. बोडोलँडच्या तरुण खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याची तयारी करावी..."

Live Update: यवतमाळ जिल्ह्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी बसस्थानकावर दाखल झालेल्या 5 नवीन बसचं संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण

यवतमाळ जिल्ह्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी बसस्थानकावर दाखल झालेल्या 5 नवीन बसचं संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण

Raigad Live : नाडे गावात अंधश्रद्धेचा पर्दाफाश; नरबळीच्या प्रयत्नामुळे भीतीचे वातावरण

रायगड जिल्ह्यातील नाडे गावात अंधश्रद्धेचा पर्दाफाश करण्यात आला. पैशाचा पाऊस पाडण्याचा विधी, जादूटोणा आणि नरबळीचा प्रयत्नामुळे गावात भीतीचं वातावरण आहे.

Kolhapur Live : मॉलमधील किंमती वस्तू लंपास करणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी घातल्या बेड्या

कोल्हापूर शहरातील मॉलमध्ये फिरून किमती वस्तूंची चोरी करणाऱ्या बंटी आणि बबलीला अटक करण्यात आली. जुना राजवाडा पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात आहे. परवेज शिलेदार आणि करिष्मा शिलेदार असे बंटी बबली जोडीचे नाव आहे. कोल्हापूर शहरातील साने गुरुजी वसाहत परिसरात असणाऱ्या एका लोकल मॉलमध्ये दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. चोरी प्रकरणी लोकल मार्टचे मॅनेजर केतन पाटील यांच्याकडून अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. जुना राजवाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मॉलमध्ये फिरून किमती वस्तूची चोरी करणाऱ्या शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या परवेज शिलेदार आणि करिष्मा शिलेदार या पती-पत्नींना घेतलं ताब्यात घेतलं आहे.

Live : मुस्लिम समाजाने नमाज 100 वेळा नमाज पठन करण्यात हरकत नाही... पण त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान ही आत्मसात करावे - गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरातील सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसीच्या दीक्षांत समारोह प्रसंगी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले कि, "मुस्लिम समाजात दुर्दैवाने ठराविक व्यवसाय लोकप्रिय आहे... त्यांनी शंभर वेळा म्शजिदमध्ये जाऊन नमाज पठन करावे...त्यात हरकत नाही... पण त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर त्यांचा भविष्याच काय होईल असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला... तसेच यावेळी पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे उदाहरणही दिल. सर्वात जास्त शिक्षणाची गरज मुस्लिम समाजाला आहे.. यासाठी मी विधान परिषदेचे आमदार असताना मला मिळालेली इंजिनिअरिंग कॉलेज अंजुमन इन्स्टिट्यूटला दिल्याच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं...मुस्लिम समाजात डॉक्टर वकील इंजिनियर घडले तर समाजाचा विकास होईल असेही ते म्हणालेत."

Bhandara Live: भंडारा जिल्ह्यातील दीड वर्षीय चिमुकल्याने कारच्या धडकेत गमावला जीव

भंडारा जिल्ह्यामधील मोहाडा तालुक्यामधील दीड वर्षीय दुर्वाश जोये या चिमुकल्याने अपघातात जीव गमावला आहे. तो अंगणात खेळत असताना आंधळगावच्या दिशेने जात असलेल्या भरधाव कारने त्याला धडक दिली. या धडकेत दुर्वाशचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. कार चालकाविरुद्ध दुर्वाशच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास आंधळगाव पोलीस करत आहेत.

A. R. Rahman Live: संगीतकार ए.आर. रहमान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

संगीतकार ए.आर. रहमान यांना डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या मुलाने त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देताना ते आता बरे असल्याचे सांगितले.

Yavatmal Live: यवतमाळ जिल्ह्यासाठी ९० नव्या एसटी बस

यवतमाळ जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्यादृष्टीने बसस्थानकावर दाखल झालेल्या ५ नव्या बसचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Live : अहिल्यानगरमध्ये अग्नितांडव, प्लास्टीक कंपनीला आग

अहिल्यानगरमध्ये एका प्लास्टीक कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याची शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Live : संत तुकाराम महाराजांच्या चिपळ्या, गाथ्याचे दर्शन घेता येणार

संत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या आज तुकाराम बीजे निमित्त पंढरपुरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज बाळासाहेब महाराज देहुकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या, पादुका आणि अभंगाच्या हस्तलिखिताची वही असा 400 वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केलाय. यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्ताने या दुर्मिळ चिपळ्या पादुका आणि हस्तलिखिरे भाविकांना पाहायला मिळत आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कुणाला संधी?

विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळेल, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय शीतल म्हात्रे, संजय मोरे आणि किरण पांडव यांची नावं देखील आघाडीवर आहेत.

Pune Live: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांसाठी मुदतवाढ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि नव्या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने यंदा प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर केले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा ३ ते ५ जून दरम्यान आयोजित केली जाणार आहे.

पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील प्रवेश परीक्षांच्या अर्ज भरायला मुदतवाढ

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली

पदवी अभ्यासक्रमासाठी ३० एप्रिलपर्यंत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी २० मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे

विद्यार्थी व पालकांची मागणी आणि नव्या शिक्षण धोरणाची अंमलबजावणी विचारात घेऊन यंदा लवकर प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा ३ ते ५ जुन दरम्यान घेतली जाणार आहे

Live : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर

भाजपाकडून आज विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.

एआर रहमान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल

प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांना छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

मोदी जाताना देशाचे तुकडे करून जातील, १० वर्षात दोन राष्ट्र निर्माण झाल्याची राऊतांची टीका

मोदी शहांचे राज्य एक दिवस जाणारच आहे. पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील. गेल्या दहा वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्र निर्माण झाली आहेत. हे वातावरण फाळणीसदृष्य असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरात केलीय.

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमानात प्रचंड वाढ

राज्यात तापमानात प्रचंड वाढ झाली असून विदर्भात उन्हाचा प्रचंड कडाका आहे. हवामान खात्यानेही विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Beed : खोक्यानंतर आणखी एकामुळे सुरेश धस अडचणीत

सतीश भोसले उर्फ खोक्यानंतर आता आणखी एका कार्यकर्त्यामुळे सुरेश धस अडचणीत आले आहेत. आशिष विशाळ असं त्याचं नाव असून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना मदतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, सुरेश धस यांनी हा आपला कार्यकर्ता नसल्याचं म्हटलंय.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या पुतण्याची हत्या

पाकिस्तानात लष्कर ए तय्यबाच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या करण्यात आलीय. हाफिज सईदचा तो पुतण्या होता. त्याच्यासोबत असलेली एक व्यक्ती जखमी झाली असून ती हाफिज सईद असल्याचा दावा केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.