सतीश भोसले ऊर्फ खोक्याभाईने मारहाण केलेल्या ढाकणे कुटुंबियाची भेट घेतली. ढाकणे कुटुंबियांची विचारपूस केली. ढाकणे कुटुंबियांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली. अमानुष मारहाण केली आहे. आमचा देखील संतोष देशमुख झाला असता, अशी भीती ढाकणे कुटुंबियांनी आमदार धस यांच्यासमोर व्यक्त केली.
Ramdas Athawale : 'झटका' असो वा 'हलाल' आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे; रामदार आठवलेंची कोपरखळीदलितांच्या मतांचा विचार करता आरपीआयला देखील मंत्रिपद मिळायला पाहिजे. झटका' असो वा 'हलाल' आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे, अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुती सरकारला सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना लगावली.
Kailas Nagare : कैलास नागरे यांनी आत्महत्या नव्हे, बलिदान दिलं आहे; बहीण सत्यभामाने राजकारण्यांना सुनावलेबुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळमधील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांची बहीण सत्यभामा नागरे यांनी मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार मनोज कायंदे यांच्या समोर राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहे. 'माझ्या भावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका. तर बलिदान हा शब्द वापरावा', असं भावनिक आवाहनही सत्यभामा नागरे यांनी केलं.
Maharashtra Kesari Competition : महाराष्ट्र केसरीच्या मैदानाची तयारी कर्जतमध्ये सुरू; रोहित पवार यांचा पुढाकार, रंगणार स्पर्धाअहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार 26 ते 30 मार्च या काळात रंगणार आहे. 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचा प्रारंभ आमदार रोहित पवार, प्रताप ढाकणे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकारी उपस्थित होते.
Legislative Council Elections : विधान परिषदेत अहिल्यानगर जिल्ह्याला डावलले; महायुती राजकारणापुढं स्थानिक नेते हतबलअहिल्यानगर जिल्ह्यातून महायुतीला विधानसभा निवडणुकीत दहा आमदार मिळाले आहेत. परंतु, एकच मंत्रिपद मिळाले. त्यात आता विधान परिषदेतूनही महायुती सरकारने जिल्ह्याला डावलले असून, एकाही नेत्याची विधान परिषदेवर वर्णी लागणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील जिल्ह्याचा दबदबा कमी झालाय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
Vighnahar Sugar Factory Election : जुन्नरमधील विघ्नहर साखर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांचे निर्विवाद वर्चस्वजुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी पुन्हा एकदा एकहाती वर्चस्व राखले आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 पैकी तब्बल 17 जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. हे बिनविरोध निवडण्यात आलेले सर्वच सर्व संचालक हे शेरकर यांच्या गटाचे आहेत. उर्वरीत चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही शेरकर यांंनीच बाजी मारली आहे, त्यामुळे विघ्नहर कारखान्यावर सत्यशील शेरकर यांनी एकहाती झेंडा फडकविला आहे.
NCP SP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यात बैठकराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक होत आहे. खासदार सुप्रिया सुळे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथील पक्ष पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पुणे शहराचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला आजी माजी आमदार, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहे.
Sharad Pawar : शरद पवार यांनी जागेवरच धडा शिकवला पाहिजे होताशरद पवार यांनी आधीच नेत्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या असत्या आणि जागेवरच धडा शिकवला असता तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं. धनंजय मुंडे यांचे कान आधीच का पकडले गेले नाहीत. हे सगळं थांबवायला पाहिजे होते, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरद पवार यांच्यावर केली.
विशाल पाटलांना भाजपची जाहीर ऑफरसांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी जाहीर ऑफर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या या ऑफरवर विशाल पाटील यांनी मात्र बोलणे टाळले आहे.
मुलीचे कारनामे वडिलांच्या अंगलट; सोने तस्करी प्रकरणात पोलीस महासंचालकांवर मोठी कारवाईअभिनेत्री रन्या राव हिला सोने तस्करी प्रकरणात काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. आता तिचे वडील आणि पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
Eknath Shinde live: एकनाथ शिंदे संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानितदेहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. देहू संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त आज लाखो वारकरी देहूत दाखल झाले आहेत.
Vidhan Parishad Election 2025: भाजपकडून जोशी, केनेकर, संदीप जोशी यांची नावे जाहीरविधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होत आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी अशी त्यांची नावे आहेत.
Maharashtra News LIVE : पॅनकार्डप्रमाणेच मतदार कार्डही आधारशी जोडले जाणार?मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 18 मार्चला केंद्रीय गृह सचिव आणि कायदा व न्याय मंत्रालयाचे सचिव यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मतदार पॅनकार्डप्रमाणेच मतदार कार्डही आधारशी जोडण्याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरात मतदारयाद्यांमध्ये घोळ होत अल्याचे आरोप होत आहेत. यावरून हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News LIVE : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 96 दिवस पूर्णबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 96 दिवस पूर्ण झाले. पण अद्यापही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. कृष्णा आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत असून तो फरार आहे.
Maharashtra News LIVE : उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटउद्योगपती गौतम अदानींनी शनिवारी (ता. 15) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. तर राज्यातील विविध प्रकल्पांबाब दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच अदानी समूहाने धारावी प्रकल्पाची बोली जिंकली होती. यानंतरही पहिलीच भेट आहे.
Prime Minister Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावरदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते नागपूरच्या माधव नेत्रालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करणारा आहेत. याच दौऱ्यात ते येथील रेशीमबागच्या स्मृतिमंदिरला भेट देण्याची शक्यता असून डॉ हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील अशी चर्चा सुरू आहेत. तर संघाच्या शतकपूर्ती वर्षातील 30 मार्च गुडीपाडवाच्या दिवशी होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाण्याची शक्यता आहे. तसेच या दौऱ्यात ते दीक्षाभूमीला पण भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Shivendrasinghraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते? शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले...छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक किती होते? या प्रश्नावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. याच मुद्द्यावरून मत्स आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य करून नवीन वाद निर्माण केला आहे. याच मुद्द्यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना, याबाबत ठोस अशी माहिती नसली तरी इतिहासकारांनी योग्य पद्धतीने मांडली केली आहे. त्यामुळं त्यांच्यावर चर्चा करणं किंवा वाद घालणं योग्य नाही नसल्याचे म्हटलं आहे
Beed News : खोक्या भाईनंतर आणखी एकामुळे सुरेश धस अडचणीतसतीश भोसले उर्फ खोक्यामुळे भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आले आहेत. सध्या त्यांच्यावरही आका म्हणून टीका होत आहे. अशातच आता दुसऱ्या आणखी एका कार्यकर्त्यामुळे धस अडचणीत आले आहेत. आशिष विशाळ असं त्याचं नाव असून संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना मदतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, सुरेश धस यांनी हा आपला कार्यकर्ता नसल्याचं म्हटलंय
School Exam News : पहिली ते आठवीच्या परीक्षा उन्हाळ्यात नको; आमदार प्रवीण स्वामी यांची मागणीराज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून शाळेतील पहिली ते आठवीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे लहान मुलांना उष्णतेच्या झळांचा सामना कारावा लागू शकतो. यामुळे पहिली ते आठवीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात घ्या, अशी मागणी आमदार प्रवीण स्वामी यांनी केली आहे.
Karnataka KTPP Act : सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण; भाजपचा हल्लाबोलकर्नाटक सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. त्यामुळे आता या निर्णयावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तर कर्नाटक सरकारचा हा निर्णय देशासाठी घातक असल्याचा दावा केला आहे. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निर्णयाला विरोध करताना भाजपने हा निर्णय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्याविरुद्ध असल्याचेही म्हटलं आहे.
Beed Crime News : पोलिसांकडून खोक्या भाईची चौकशी, 7 दिवसांची पोलीस कोठडीभाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. यानंतर पोलीसांनी थेट त्याला थेट शिरूर कासार येथील बावी गावी दाखवले. जेथे त्याने माळरानावर ढाकणे पितापुत्रांना मारहाण केली होती. तसेच येथेच त्याची चौकशी करण्यात आली. तसेच घडलेल्या घटनेचा घटनाक्रम जाणून घेतला. सतीश भोसलेवर ढाकणे पितापुत्रांच्या मारहाणीसह, हरिणांच्या शिकारीचा गुन्हा दाखल आहे.
Aurangzeb Tomb News : 'तरच कबरला हात न लावणे योग्य ठरेल' - आमदार रोहित पवारऔरंगजेबाच्या कबरीवरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. अनेकांनी ही कबर उखडून टाकण्याची मागणी केली. आता यावर राष्ट्रवादी पक्ष SP चे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. '27 वर्ष औरंगजेबाला येथे राहून राज्य करता आलं नाही ज्याच प्रतीक औरंगजेबाची कबर आहे. ही कबर आज काढून टाकली तर भविष्यात लोक गडबड करतील त्यामुळे एक प्रतीक म्हणून त्या कबरीला हात न लावणेच योग्य ठरेल' त्यांनी म्हटलं आहे.