IPL : बॉल बॉय ते कॅप्टन, टीम इंडियाच्या खेळाडूचा थक्क करणारा प्रवास, कोण आहे तो?
GH News March 17, 2025 08:10 PM

श्रेयस अय्यर, टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज आणि सर्वोत्तम फिल्डरपैकी एक. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर आता आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार 22 मार्चपासून संगणार आहे. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना हुक्क्याच्या व्यासपीठासह ओळख मिळली. तसेच खेळाडू आर्थिकरित्या सक्षम झाले. श्रेयस अय्यर याचा प्रवास हा त्यापेक्षा वेगळा आहे. आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. श्रेयस अय्यर आयपीएलच्या पहिल्या हंगामात बॉल बॉय होता. तर श्रेयस अय्यर आता एका संघाचा कर्णधार आहे. तसेच श्रेयसने त्याच्या नेतृ्त्वात आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची कामगिरी केली आहे. श्रेयसची बॉल बॉय ते चॅम्पियन कॅप्टन अशी नेत्रदीपक कामगिरी राहिली आहे.

श्रेयस अय्यर 18 व्या हंगामात पंजाब किंग्सचं नेतृत्व करणार आहे. पंजाब किंग्सने श्रेयससाठी 26 कोटी 75 लाख रुपये मोजले. श्रेयस यासह आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. श्रेयसने त्याआधी कर्णधार म्हणून 17 व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सला 12 वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. एखाद्या सिनेमात शोभेल असा श्रेयसचा हा इथपर्यंतचा प्रवास आहे. श्रेयसने आयपीएलच्या पहिल्या हंगामात बॉल बॉय असल्याचं स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

बॉल बॉय श्रेयस अय्यर

मी आयपीएलच्या पहिल्या हंगामात 2008 साली मुंबई विरुद्ध बंगळुरुच्या सामन्यात बॉल बॉय होतो, असं श्रेयसने सांगितलं. तेव्हा मी पहिल्यांदा आयपीएलमध्ये रॉस टेलर याची भेट घेतली होती. मी तेव्हा लाजाळू होतो. जेव्हा काही मागायची वेळ आली तेव्हा मी अडखळलो होतो, असंही श्रेयसने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.

दिल्लीकडून आयपीएल पदार्पण आणि 7 वर्ष प्रतिनिधित्व

श्रेयस अय्यर याने 2015 साली दिल्ली कॅपिट्ल्सकडून आयपीएल पदार्पण केलं. श्रेयसने 7 वर्ष दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं. श्रेयसला या दरम्यान दिल्लीचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तसेच श्रेयसने 7 पैकी 4 हंगामात 400 पेक्षा अधिक धावा केल्या. तर श्रेयसने एकदा 500 धावाही केल्या होत्या.

3 वर्ष केकेआरच्या गोटात

श्रेयस त्यानंतर 2022 साली कोलकाता टीमसह जोडला गेला. श्रेयसने 2022 मध्ये केकेआरकडून खेळताना 14 सामन्यांमध्ये 401 धावा केल्या. त्यानंतर श्रेयस 16 व्या मोसमात (Ipl 2023) खेळला नाही. मात्र त्यानंतर श्रेयसने 17 व्या मोसमात कमबॅक केलं. श्रेयसने केकेआरला 17 व्या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली.

श्रेयस अय्यरचा प्रवास

श्रेयस आतापर्यंत आयपीएलच्या 9 हंगामांत खेळला आहे. श्रेयसने या 9 हंगामातील 116 सामन्यांपैकी 115 डावांत 3 हजार 127 धावा केल्या आहेत. श्रेयसने या दरम्यान 21 अर्धशतकं केली आहेत. श्रेयस आता 18 व्या मोसमात पंजाब किंग्सचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे श्रेयसने कॅप्टन म्हणून केकेआरसाठी केलेली कामगिरी पंजाबसाठी करावी, अशी आशा क्रिकेट चाहत्यांची असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.