Crime News: 'तुम्ही टकले आहात...'! पत्नी वारंवार चिडवायची; पती कंटाळला अन् रागात नको ते करून बसला, काय घडलं?
esakal March 17, 2025 08:45 PM

कर्नाटकातील चामराजनगर तालुक्यात पत्नीच्या चिडवण्यामुळे नाराज झालेल्या एका पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु मरण्यापूर्वी त्याने आपल्या दुःखाचे वर्णन करणारी सुसाईड नोट लिहिली. उदिगाला गावातून हे प्रकरण समोर आले आहे. जिथे एका व्यक्तीने प्रथम सुसाईड नोट लिहिली आणि नंतर आत्महत्या करून आपले जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव ३२ वर्षीय पराशिवमूर्ती असे होते. त्याची पत्नी ममता अनेकदा त्याची खिल्ली उडवायची. म्हणायची की तुम्ही टकले आहात. तुमच्या डोक्यावर केस नाहीत आणि मला तुझ्यासोबत बाहेर जायला लाज वाटते. पत्नीच्या बोलण्याने दुःखी होऊन परशिवमूर्तीने केली. या प्रकरणी चामराजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परशिवमूर्ती आणि ममता यांचे लग्न दोन वर्षांपूर्वी चामराजनगर ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरात झाले होते. परशिवमूर्ती हा व्यवसायाने ड्रायव्हर होता आणि तो ट्रक चालवत असे. लग्नानंतर, परशिवमूर्तीचे केस पूर्णपणे गळून पडले. ममता याबद्दल तिच्या नवऱ्याची खिल्ली उडवायची आणि म्हणायची की जर मी तुझ्यासोबत बाहेर गेली तर मला लाज वाटेल.

ममतावर परशिवमूर्ती यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा खोटा खटला दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवल्याचाही आरोप आहे. याशिवाय, सोशल मीडियावर सक्रिय असलेली ममता विवाहित असूनही विचित्र फोटो शेअर करायची. या प्रकरणावरून घरात वारंवार भांडणेही होत असत. पत्नीने सांगितलेल्या या सर्व गोष्टींमुळे त्रासलेल्या परशिवमूर्तीने आत्महत्या केली.

असे म्हटले जात आहे की, परशिवमूर्ती यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांच्या पत्नीने त्यांच्या टक्कल पडण्याची आणि हुंड्यासाठीच्या छळाची खिल्ली उडवल्याचे लिहिले होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर, परशिवमूर्ती यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.