सावंतवाडीत शिवरायांना ठाकरे गटातर्फे अभिवादन
esakal March 17, 2025 08:45 PM

swt177.jpg
51711
सावंतवाडीः ठाकरे शिवसेनेतर्फे शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

सावंतवाडीत शिवरायांना
ठाकरे गटातर्फे अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज तिथीनुसार येथील शाखेत शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ''जय भवानी, जय शिवाजी''च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, युवा कार्यकर्ते आशिष सुभेदार, शहरप्रमुख शैलेश गौंडळकर, उदय अळवणे, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, माजगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक धुरी आदी उपस्थित होते.
...........

swt178.jpg
51712
सावंतवाडीः शिंदे शिवसेनेमार्फत छत्रपती शिवरायांना वंदन करण्यात आले.

शिवसेनेतर्फे सावंतवाडीत
छत्रपती शिवरायांना वंदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार आज साजरी केली. जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते खासकीलवाडा येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ''जय शिवाजी, जय भवानी'' अशा घोषणा देऊन शिवरायांना वंदन करण्यात आले. यावेळी शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबू कुडतरकर, गजानन पालव, परीक्षित मंत्रीकर, प्रशांत साटेलकर, सचिन साटेलकर, गजानन नाटेकर, दीपाली सावंत, भारती मोरे, लतिका सिंग, जोत्स्ना मेस्त्री, सुप्रिया सांगेलकर आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.