वरकुटे परिसरात बाजरी बहरली
esakal March 17, 2025 08:45 PM

लोणी देवकर, ता. १७ : वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) परिसरात उन्हाळी बाजरीचे पीक जोमात बहरले आहे. ऊस आणि मका पीक घेतल्यानंतर रिकाम्या झालेल्या शेतात उन्हाळी बाजरी घेण्याचे प्रमाण या भागात लक्षणीय आहे. उन्हाळ्यात बाजरी कमी कालावधीत पीक चांगले येते. त्यामुळे बहुतांश शेतकरी या पिकाला पसंती देतात.

बाजरी पिकावर रासायनिक फवारणी करण्याचा खर्च वाचतो. अत्यंत कमी दिवसांत भरघोस उत्पन्नही येते. घरगुती वापरासाठी अलीकडे शेतकरी बाजरीचे पीक घेण्यास पसंती देत असल्याचे दिसत आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या अन्नधान्यांच्या उत्पन्न होते वेळी होत असलेल्या रासायनिक खताच्या अतिरेकी वापरामुळे वरकुटे परिसरातील शेतकरी उपजीविकेसाठी आवश्यक असणारे अन्नधान्य हे स्वतःच्या शेतात पिकवताना दिसत आहे. आता सध्या हे पीक निसावून कणसे बाहेर पडली आहेत. येत्या काही दिवसांत शेतकरी बाजरीच्या काढणीस सुरुवात करतील.

उन्हाळी बाजरीचे पीक कमी मेहनत, कमी खर्च आणि कमी पाण्यात जोमाने येणारे पीक आहे. शिवाय उन्हाळ्यात मोकळ्या राहणाऱ्या जमिनीत हे पीक घेतले जाते. त्यामुळे, बहुतांश शेतकरी उन्हाळ्यात या पिकाची निवड करतात.

00015

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.