टोकावडे, ता. १७ (बातमीदार)ः ठाणे जिल्ह्याचे तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस वाढले आहे. मार्चपासूनच उन्हाचा पारा वाढू लागल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या हंगामात बाजारात ताडगोळ्यांना मागणी वाढल्याचे चित्र आहे.
उन्हापासून बचावासाठी ताडगोळेसारखी शीतफळे खरेदी करत आहेत. अतिशय मऊ आणि रसदार ताडगोळे चवीला गोड असून, प्रकृतीला थंड असतात. ताडगोळ्यातील पोषक घटकांमुळे मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. तसेच त्यांच्या विक्रीतून उन्हाळ्यामध्ये रोजगार मिळत आहे. सध्या ताडगोळे कमी प्रमाणात मिळत असल्याने बाजारात १२० ते १४० रुपये डझनाप्रमाणे विकले जात आहेत. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीरात पाणी कमी झाल्याने अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे या काळात आहारात विविध फळांचा समावेश असावा, असे तज्ज्ञ सांगतात.