अहो कार नाही तुफान, दमदार फीचर्ससह किंमतही बजेटमध्ये, जाणून घ्या
GH News March 17, 2025 09:11 PM

तुम्ही कार घेण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आम्ही अशी एक कार घेऊन आलो आहोत, ज्याचे फीचर्स तुम्हाला आवडतील. या कारची किंमत देखील तुमच्या बजेटमध्ये आहे. मारुती सुझुकीने नुकतीच नेक्स्ट जनरेशन डिझायर भारतात लाँच केली आहे. याविषयी पुढे जाणून घेऊया.

मारुती सुझुकी डिझायर ही अशीच एक मध्यम आकाराची सेडान कार आहे, जी अनेक वर्षांपासून सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही कार आपल्या कॅटेगरीमध्ये आघाडीवर आहे. फेब्रुवारी 2025 मध्येही ही कार 14,694 युनिट्सच्या विक्रीसह पहिल्या क्रमांकावर होती. तर ह्युंदाईची ऑरा 4,797 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या, होंडा अमेज 3,263 युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मारुती सुझुकीने नुकतीच नेक्स्ट जनरेशन डिझायर भारतात लाँच केली आहे. अपडेटेड सब-फोर मीटर सेडानची सुरुवातीची किंमत 6.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यापूर्वी नवीन मारुती सुझुकी डिझायरला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाले होते. 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारे हे कंपनीच्या लाइनअपमधील पहिले मॉडेल आहे.

डिझायरचे जबरदस्त फीचर्स

नवीन डिझायरच्या इंटिरियरमध्ये ड्युअल कलर थीम देण्यात आली आहे. डॅशबोर्ड गडद राखाडी, बनावट लाकूड आणि सिल्व्हर टचमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. अपहोल्स्ट्री बेज रंगात देण्यात आली आहे. वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह कनेक्टेड कार वैशिष्ट्यांसह 9 इंचाचा स्मार्टप्ले प्रो प्लस टच स्क्रीन युनिट सह येतो. विशेष म्हणजे यात सेगमेंट फर्स्ट इलेक्ट्रिक सनरूफ, 9 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, फ्लॅट बॉटम स्टीअरिंग व्हील देण्यात आले आहे. कारच्या वरच्या मॉडेलमध्ये 360 डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, रियर एसी व्हेंट आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत, इंजिन आणि मायलेज

चौथ्या जनरेशनच्या डिझायरमध्ये नवीन 1.2 लीटर झेड सीरिज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, ज्यात 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिट आहे. हे इंजिन 80 बीएचपीपॉवर आणि 112 एनएम टॉर्क जनरेट करते. हे CNG व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध आहे जे 68 बीएचपी आणि 102 एनएम आउटपुट जनरेट करते. एलएक्सआय, व्हीएक्सआय, झेडएक्सआय आणि झेडएक्सआय+ या पेट्रोल व्हेरिएंटसाठी हे चार ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. तसेच, सीएनजी केवळ मिड-स्पेक व्हीएक्सआय आणि झेडएक्सआय ट्रिम्सवर उपलब्ध आहे. डिझायरची एक्स शोरूम किंमत 6.79 लाख रुपयांपासून 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार पेट्रोलसह 25 किमी पर्यंत आणि CNG सह 33 किमीपर्यंत मायलेज देते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.