Saif And Kareena Divorce : सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार? दीड वर्षात घेणार घटस्फोट? कारण..
Saam TV March 17, 2025 10:45 PM

Saif Ali Khan Kareena Kapoor : सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे बॉलिवूडमध्ये पावर कपल आहे. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले होते. करीनाच्या आधी सैफचे अमृता सिंहशी लग्न झाले होते. त्यांचा २००१ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या ११ वर्षांनी सैफने दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला. सैफ आणि करीना या कपलबद्दल एका ज्योतिषाने केलेल्या भविष्यवाणीची सध्या चर्चा होत आहे.

भारतीय ज्योतिशी सुशील कुमार सिंह यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा २०२६ मध्ये घटस्फोट होणार आहे. युट्यूबर सिद्धार्थ कन्ननने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सुशील कुमार यांनी सैफ-करीनाचा पुढील दीड वर्षात घटस्फोट होईल असे भाकीत केल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

सिद्धार्थ कन्ननला सैफ आणि करीना दोघांची कुंडली दाखवत सुशील कुमार म्हणाले, 'ही सैफ-करीनाची कुंडली आहे, हे लग्न जास्त वेळ टिकणार नाही असं भाकीत मी २०१० मध्ये केले होते. त्याबद्दल ब्लॉगमध्ये लिहिले आहे' त्यांनी सैफवर झालेल्या चाकू हल्ल्याला कौटुंबिक मुद्दा असे म्हटले.

ज्योतिषी सुशील कुमार सिंग म्हणाले, 'हा मुद्दा कधीच सुटणार नाही. त्यांच्या जन्मकुंडलीनुसार, हे जोडपे पुढील दीड वर्षात घटस्फोट घेऊ शकते.' दरम्यान या भाकीतामुळे सैफ आणि करीना यांचे चाहते नाराज झाले आहेत. सैफ अली खानने २०१२ मध्ये लग्न केले. त्यांना तैमूर आणि जेह अशी दोन मुलं आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.