‘लुट गया पाकिस्तान क्रिकेट बोर्ड’, PCB ला 2383 कोटींचा लागला चुना, नेमका काय आहे प्रकार?
GH News March 18, 2025 12:14 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) केले होते. या स्पर्धेत पाकिस्तानी क्रिकेट संघ पहिल्याच टप्प्यात बाहेर पडला. त्यामुळे पाकिस्तानात होणाऱ्या स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यापासून पाकिस्तानी क्रिकेट संघ दिसला नाही. या स्पर्धेमुळे पाकिस्तानी क्रिकेटच्या देशांतर्गत स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचा पगारही कमी करण्यात आला. आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिने टॅम्पियन्स ट्रॉफी पीसीबीसाठी मोठ्या नुकसानीचा सौदा झाला आहे. एका रिपोर्टनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेमुळे 2383 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तान बोर्डाचे 2383 कोटी रुपयांचे नुकसान

द टेलीग्रॉफच्या एका रिपोर्टनुसार, पीसीबीने रावलपिंडी, लाहोर आणि कराची हे तीन स्टेडियम स्पर्धेसाठी अपग्रेड केले. त्यावर 18 अब्ज पाकिस्तानी रुपये (जवळपास 58 मिलियन डॉलर) खर्च करण्यात आला. त्यांच्या बजेटपेक्षा हा खर्च 50 टक्के जास्त होता. तसेच या स्पर्धेच्या तयारीसाठी 40 मिलियन डॉलर खर्च करण्यात आले. दुसरीकडे पाकिस्तानला होस्टिंग फी आणि तिकीट विक्रीतून तसेच स्पॉन्सरशिपमधून केवळ 6 मिलियन डॉलर मिळाले. म्हणजेच पाकिस्तानचे 85 मिलियन डॉलरचे नुकसान या स्पर्धेमुळे झाले आहे. ते पाकिस्तानी करेन्सीच्या 2383 कोटी रुपये होते.

पाकिस्तानी संघ केवळ एक सामना खेळला

पाकिस्तानचा संघ मोहम्मद रिझवान याच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफीत उतरला होता. परंतु हा संघ केवळ एक सामनाच खेळू शकला. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर हा सामना झाला होता. त्यानंतर पाकिस्तानचा दुसरा सामना रावलपिंडीत बांगलादेशविरुद्ध होता. परंतु या सामन्यात पाऊस आला. त्यामुळे नाणेफेक न होताच हा सामना रद्द करावा लागला. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या इतर आठ सामन्यापैकी दोन सामने पावसामुळे रद्द झाले. त्याचा परिणाम पीसीबीच्या उत्पन्नावर झाला.

द टेलीग्रॉफच्या रिपोर्टनुसार, पीसीबीच्या झालेल्या नुकसानीचा परिणाम खेळाडूंवर झाला आहे. पाकिस्तानमधील राष्ट्रीय टी20 चॅम्पियन्स स्पर्धेत खेळाडूंना मिळणारी रक्कम 90 टक्के कमी केली आहे. जे खेळाडू पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबत होते, ते साध्या निवासस्थानांमध्ये थांबत आहे. परंतु प्रशासक लाखो रुपये पगार घेत आहे. पाकिस्तानीमधील दैनिक द डॉनमध्ये लिहिले आहे की, पीसीबी कोणत्याही घोषणेशिवाय सामन्याचे शुल्क 40,000 रुपयांवरुन 10,000 रुपये केले आहे. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पीसीबी आर्थिक संकटात आल्याचे दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.