पालघरमधील रोजगार मेळाव्यात ३५ जणांना नोकरी
esakal March 18, 2025 12:45 AM

पालघरमधील रोजगार मेळाव्यात ३५ जणांना नोकरी
वाणगाव, ता. १७ (बातमीदार) : वीर एकलव्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघर येथे पंडित दीनदयाळ रोजगार मेळावा आणि पंतप्रधान नॅशनल अप्रेंटीशीप मेळावा बीटीआरआय वानगाव यांच्यामार्फत आयोजित केला होता. या मेळाव्यामध्ये एकूण १२ कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. या वेळी ६५ पैकी ३५ उमेदवारांना तत्काळ नोकरी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी महेशकुमार दयानंद सिडाम होते. त्यांच्या पुढाकाराने जवळपास ३० ऑन जॉब ट्रेनिंगचे करार संबंधित कंपन्यांबरोबर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एमएसआरटीसीचे धारगावे, सीआयआयच्या विनिता पाटील, प्रकाश कणसे, कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी संजय भोई, प्रशांत बोकंद, मिलिंद गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या वेळी पालघर आयटीआयचे प्राचार्य उमाकांत लोखंडे, अनंत भंगाळे, उज्वला वीर, किशोर आहेर, यांनी अहोरात्र मेहनत घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.