आयपीएलच्या सर्वच्या सर्व 18 पर्वात हे 8 खेळाडू खेळणार! फक्त आर अश्विनचं नशिब निघालं फुटकं
GH News March 18, 2025 01:08 AM

आयपीएल स्पर्धेबाबत क्रीडाप्रेमींमध्ये कायम उत्सुकता आहे. क्रिकेटचा खराखुरा आनंद लुटण्याची मेजवाणी असते. सामना कधी कोणत्या क्षणाला फिरेल सांगता येत नाही. अशा या खेळाचा रोमांच 22 मार्चपासून अनुभवता येणार आहे. ही स्पर्धा 2008 पासून सुरु झाली आहे आणि यंदाचं 18वं पर्व आहे. या स्पर्धेत 8 खेळाडू असे आहेत जे पहिल्या पर्वापासून या स्पर्धेचा भाग आहेत. त्यांचा फॉर्म आणि खेळ पाहता ते दिग्गज खेळाडूंच्या श्रेणीत बसले आहेत. आयपीएल 2025 मध्ये लीगच्या पहिल्या हंगामात खेळणारे 8 खेळाडू म्हणजे एमएस धोनी, आर अश्विन, विराट कोहली, रोहित शर्मा, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा आणि अजिंक्य रहाणे.. या खेळाडूंपैकी आर अश्विन पहिल्या पर्वात होता. पण त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. पहिल्या पर्वात तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. पण त्याला 2009 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. आता झालेल्या मेगा लिलावानंतर आर अश्विन चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे.

दुसरीकडे, आठ खेळाडूंपैकी फक्त चार खेळाडूंनी लीगच्या प्रत्येक पर्वात किमान एक सामना खेळला आहे. एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि मनीष पांडे हे खेळाडू आयपीएलच्या प्रत्येक पर्वात खेळले आहेत. विराट कोहली सर्व पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्ज तसेच रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडूनही खेळला. रोहित शर्माने डेक्कन चार्जर्सपासून सुरुवात केली. पण गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्ससोबत खेळत आहे. दुसरीकडे, मनीष पांडे सात संघांसाठी खेळला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 264 आयपीएल सामने खेळले आहेत. रोहित शर्माने 257 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, विराट कोहलीने 252 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. रवींद्र जडेजाने 240 सामने खेळले. दुसरीकडे, अश्विनने 212 सामने, अजिंक्य रहाणेने 185 सामने, मनीष पांडेने 171 सामने आणि इशांत शर्माने 110 सामने खेळले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.