Nagpur Violence : अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाची वर्दी खेचली, नागपूर हिंसाचारादरम्यान धक्कादायक घटना; गुन्हा दाखल
esakal March 19, 2025 06:45 PM

Nagpur Violence FIRs Registered After Assault on Female Police Officers Amid Clashes : नागपूर हिंसाचारादरम्यान अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आहे. एकीकडे दंगल सुरू असतानाच काही समाजकंटकांनी महिला पोलिसावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु झालेल्या वादातून सोमवारी संध्याकाळी नागपूर हिंसाचार उफाळून आला. यावेळी नागपुरात दोन गटांमध्ये दगडफेक झाली. त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसाची वर्दी खेचण्याचा प्रयत्न या जमावातील काही जणांकडून करण्यात आला. याप्रकरणी गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री झालेल्या दंगली दरम्यानचे अनेक व्हिडिओ आता समोर आले आहे. त्यामध्ये अश्लील शिवीगाळ झाल्याचं दिसून येते. या घटनेचे पडसाद विधानसभेतही बघायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करत घटनेची सविस्तर माहिती दिली.

दरम्यान, नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम आहे. नारिकांना केवळ वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून ५० पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. सायबर पोलीस सोशल मीडियावर नजर ठेऊन आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.