Maharashtra Live Update: कल्पना चुंबळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती
Saam TV March 19, 2025 06:45 PM
Pandharpur: पंढरपूर तालुक्यात झाडांसोबत साजरी केली रंगपंचमी

आज रंगपंचमी सर्वत्र उत्साह साजरी केली जात असतानाच पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील पर्यावरण प्रेमींनी झाडांना रंग लावून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी केली.

लेकीचे झाड अभियानांतर्गत ज्ञानेश्वर दुधाने यांच्या संकल्पनेतून गावातील तरुणांनी एकत्रित येऊन झाडांसोबत रंगपंचमी साजरी केली.

झाडांना नैसर्गिक रंग लावून येणाऱ्या कडक उन्हाळ्यात झाडे जगवण्याचा अभिनव संकल्प करण्यात आला.

झाडांसोबत साजरी झालेली रंगपंचमी सध्या पंढरपूर तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

Yavatmal: भरधाव कंटेनरची कारला धडक,एक जण जागीच ठार; तर दोघेजण गंभीर

भरधाव असलेल्या कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला

तर दोघेजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना अमरावती रोड मार्गावरील यवतमाळच्या लोहारा परिसरात घडली आहे.

विशाल देशमुख असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून युवराज परिहार. नितीन मिश्रा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जखमी दोघांनाही उपचार अर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे तिघेजण यवतमाळ वरून नेर कडे जात असताना हा अपघात झाला अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Nashik: कल्पना चुंबळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती

- कलपना चुंबळे यांची नाशिकच्या बाजार समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड

- देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर बाजार समितीची झाली निवडणूक

- राष्ट्रवादीचे ( AP ) नेते देविदास पिंगळे यांच्या विरोधात 18 पैकी 15 संचालकांनी आणला होता अविश्वास प्रस्ताव

- आजच्या निवड प्रक्रियेवर देविदास पिंगळे यांचा बहिष्कार

- गिरीश महाजन यांच्याच आदेशाने अविश्वास प्रस्ताव आणल्याचा पिंगळे यांचा पुनरुच्चार

- या संपूर्ण प्रकरणाची माहिती अजित पवार यांना दिल्याची देखील देविदास पिंगळे यांनी दिली माहिती

- दोन वर्षांपूर्वी माझ्या पॅनल मध्ये निवडून आलेल्या संचालकांनी गद्दारी केल्याचे आरोप

Beed: देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 98 दिवसापासून फरार

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जवळपास 98 दिवस पूर्ण झालेत.

मात्र यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे आहे.

कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली आहे.

कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेर बंद करावे आणि यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असं धनंजय देशमुख यांनी म्हटले.

कृष्णा आंधळे कडे जास्त पुरावे असतील. त्यामुळे तो पोलीस यंत्रणेच्या ताब्यात येण्यासाठी एवढी दिरंगाई करतो आहे.

तर नक्कीच त्याच्याकडे ठोस पुरावे असतील आणि त्याची चौकशी गरजेची आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्याविरोधात खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

औरंगजेबाच्या कबर प्रकरणे सामना वृत्तपत्रात संपादकीय मथळ्यातून "हिंदू तालिबानी" असा उल्लेख करण्यात आला आहे,

क्रूर संघटनेची उपमा देऊन जाणीवपूर्वक हिंदू समाजाचा अपमान केला गेल्याने हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यामुळे सामना वृत्तपत्राचे संपादक उद्धव ठाकरे, व्यवस्थापकीय संपादक संजय राऊत, आणि प्रकाशक सुभाष देसाई यांच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहर पोलीस ठाण्यात ऍड शेखर जोशी यांनी तक्रार दाखल केली आहे,

तिघांवरही गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे...

Amravati: अमरावती जिल्ह्यात 15 दिवसात तब्बल 457 लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा

अमरावती शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट...

मागील काही महिन्यांमध्ये अमरावती जिल्ह्यात कुत्रा चावा घेण्याच्या घटनेत झाली वाढ..

जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजच्या लशीचा साठा कमी..

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी..

Latur School: उन्हाची तीव्रता वाढल्याने लातूर जिल्ह्यातल्या शाळा सकाळच्या सत्रात, सकाळी 8 ते 1 ची शाळेची नवीन वेळ

लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढ चालला आहे..

उन्हाचा पारा वाढल्याने, जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भराव्यात अशी मागणी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती

तर मी त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळा ह्या सकाळी 8 ते दुपारी 1 च्या वेळेत भरवण्याच्या सूचना दिल्या आहेत..

दरम्यान मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढल्याने पुढच्या काळात देखील तापमान वाढीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे...

Washim: चोरद येथील रस्त्यांचे काम तीन महिन्यांपासून रखडले, नागरिक त्रस्त

वाशिमच्या चोरद येथील रस्त्याची दुरवस्था झाल्यानं रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं.

मात्र हे काम अत्यंत संथ गतीनं सुरु असून केवळ 1 किलोमीटर असंलेलं काम तीन महिने उलटूनही पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळं चोरद येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.

विद्यार्थी, कामगार, दूध व्यवसाय करणारे शेतकरी यांना प्रामुख्याने रस्त्याच्या अपूर्ण अवस्थेचा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर सर्वत्र खडी, माती, पसरवण्यात आली असून दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ह्या रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Shirdi: साई मूर्तीसह समाधी विविध रंगात रंगली, शिर्डीच्या साई मंदिरात रंगपंचमीचा उत्साह

साईबाबा आज विविध रंगात रंगले असून शिर्डीत रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय..

साई समाधी आणि साईमुर्तीवर घातलेल्या सफेद शालीवर आकर्षक रंगाची उधळण करण्यात आली असून कोट्यावधी रूपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळ साईमुर्तीला घालण्यात आली आहे..

तर साई समाधीवर बाल कृष्णाचा फोटो ठेवण्यात आलाय..

आज चार वाजता रंगाची उधळण करत साईरथाची मिरवणूक काढण्यात येणार असून हजारो भाविक आज शिर्डीत रंगपंचमी साजरी करणार आहेत...

Nandurbar: नंदुरबार शहरातून काढण्यात आली जगदंबा देवी अवताराची मिरवणूक

साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबार शहरातील बालाजी वाडा भागातील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या होलिका उत्सवाची दिवशी सांगता झाली असून पारंपारिक डफाचा वाद्यात होलिका उत्सवाचा पंचमीनिमित्त नंदुरबार शहरातून जगदंबा देवी अवताराची मिरवणूक काढण्यात आली रात्री उशिरापर्यंत या मिरवणुकीची सांगता झाली या मिरवणुकीला नंदुरबारकरांनी उदंड प्रतिसाद दिला असून यावेळी जगदंबा देवी आणि महिषासुर यांचा युद्धाचा देखावा सादर करण्यात आला.. हि मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते..

Beed: अतिमारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि शॉकमध्ये जाऊन तरुणाचा मृत्यू

बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालातून विकास बनसोडेच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.

अति मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव आणि शॉक मध्ये जाऊन विकासचा मृत्यू झाला. विकाच्या अंगावर भरपूर मारहाण झाली. शरीर काळे निळे झाले.

त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तो शॉक मध्ये गेला. आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद झाले आहे.

विकास बनसोडे या तरुणाचे आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर याच्या मुलीशी प्रेम संबंध असल्याचा संशय होता.

12 मार्चला विकास पिंपरी येथे आला होता. त्यानंतर त्याला ही मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

विकास बनसोडे हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक

बनसोडे हत्या प्रकरणात दहा जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यातील आठ आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.