आयपीएलच्या 18 व्या मोसमाला (IPL 2025) 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. क्रिकेटच्या ‘रन’संग्रामाकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. क्रिकेट चाहत्यांना 22 मार्चपासून पुढील 2 महिने सलग एकसेएक पैसावसूल सामने पाहायला मिळणार आहेत. यंदा श्रेयस अय्यर याच्याकडे पंजाब किंग्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. श्रेयसने या 18 व्या मोसमाआधी मोठा निर्णय घेतला आहे. श्रेयसने पत्रकार परिषदेत निर्णयाची माहिती दिली. पंजाब किंग्स या 18 व्या हंगाातील आपला पहिला सामना मंगळवारी 25 मार्चला गुजरातविरुद्ध खेळणार आहे.
पंजाबने श्रेयस अय्यर याच्यासाठी तब्बल 26 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर श्रेयसला कर्णधार करण्यात आलं. श्रेयसने गेल्या हंगामात आपल्या नेतृत्वात कोलकाताला आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. मात्र कोलकाताने 18 व्या मोसमआधी श्रेयसला करारमुक्त केलं. त्यानंतर आता पंजाबसाठी खेळण्याआधी श्रेयसने बॅटिंग पोजिशनबाबत मोठी अपडेट दिली आहे.
श्रेयसला 18 व्या मोसमात तिसर्या स्थानी बॅटिंग करत छाप सोडायची आहे. श्रेयसने नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केली. मात्र आता पंजाबसोबत नव्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी श्रेयस नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. या हंगामात मी पंजाबसाठी तिसर्या स्थानी बॅटिंग करुन ठसा उमटवू इच्छितो. तसंच माझी माझ्या स्थानाबाबत भूमिका स्पष्ट आहे, असं श्रेयसने स्पष्ट केलंय.
“आयपीएल भारतीय क्रिकेटचा महत्त्वाचा भाग आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. मी स्वत:ला टी 20I क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थापित करु इच्छितो. मी तिसऱ्या स्थानी बॅटिंग करण्यावरच लक्ष केंद्रीत करत आहे. मी यावेळेस तिसऱ्या स्थानी बॅटिंग करण्याबाबत ठाम आहे. मी तिथे लक्ष केंद्रीत करणार आहे”, असं श्रेयसने स्पष्ट केलं.
दरम्यान श्रेयसने टी 20 क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. श्रेयस टीम इंडियासाठी 19 सामन्यांमध्ये 530 धावा केल्या आहेत. आयपीएल ट्रॉफी जिंकण्याला महत्त्व दिलं जाईल, असं श्रेयसने म्हटलं. पंजाबला आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही, याचा माझ्यावर दबाव नाही. मी याकडे एक संधी म्हणून पाहतो, असं श्रेयसने स्पष्ट केलं.
आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी पंजाब किंग्स टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंह आणि प्रभसिमरन सिंह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, विजयकुमार वैशाक, यश ठाकुर, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, पायला अविनाश, जेवियर बार्टलेट, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, एरॉन हार्डी, प्रियांश आर्य, कुलदीप सेन, हरनूर पन्नू, अझमतुल्लाह ओमरझई, लॉकी फर्ग्युसन, जॉश इंग्लिस आणि मार्को यानसन.