टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. विराटला त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करण्यात यश आलं. आता चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणे आयपीएलच्या 18 व्या मोसमातही तशीच कामगिरी करण्यासाठी विराट प्रयत्नशील असणार आहे. विराटने टी 20I वर्ल्ड कप फायनल 2024 नंतर सर्वात छोट्या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता विराट आयपीएलच्या माध्यमातून टी 20 क्रिकेट खेळणार आहे. या 18 व्या मोसमातील पहिला सामना गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये होणार आहे. या सामन्यानिमित्ताने विराटची ईडन गार्डनमध्ये आतापर्यंत कामगिरी कशी राहिली आहे? तसेच त्याने केकेआरविरुद्ध किती धावा केल्या आहे. हे आपण जाणून घेऊयात.
विराट आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीपासून बंगळुरु टीमसाठी खेळतोय. विराटने आतापर्यंत ईडन गार्डनमध्ये एकूण 13 आयपीएल सामने खेळले आहेत. विराटला त्यापैकी 12 सामन्यांत बॅटिंगची संधी मिळाली आहे. विराटने या 12 डावांत 37.10 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत. तसेच विराटने 130.18 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. विराटने ईडन गार्डनमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे. तसेच विराट या मैदानात एकदा झिरोवर आऊट झाला आहे.
विराटने कोलकाताविरुद्ध ईडन गार्डनमध्ये 12 सामन्यांतील 11 डावांत बॅटिंग केली आहे. विराटने या दरम्यान 38.44 च्या सरासरीने 346 धावा केल्या आहेत. तसेच विराटने आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत कोलकाताविरुद्ध एकूण 34 सामन्यांमध्ये 38.48 च्या सरासरीने 962 धावा केल्या आहेत. विराटने केकेआरविरुद्ध एकूण 1 शतक आणि 6 अर्धशतकं झळकावली आहेत.
कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामना हा 22 मार्चला खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता विराट या सामन्यात कशी कामगिरी करतो? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयपीएल 2025 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, लियाम लिविंगस्टोन, फिल सॉल्ट, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, रसिख डार सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंह, नुवान तुषारा, मनोज भंडागे, स्वास्तिक चिकारा, लुंगी एन्गिडी, अभिनंदन सिंह आणि मोहित राठी.