Maharashtra News Live Updates: पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, कुटुंबीयांच्या नावावर १२ कोटींची मलामत्ता
Saam TV March 20, 2025 06:45 PM
Nashik News: कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी

नाशिक -

- राज्यात मुबलक कांदा, त्यामुळे 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी

- राज्यात मुबलक कांदा आहे की नाही? याबाबत हेलिकॉप्टरने पाहणी करा

- हेलिकॉप्टरने पाहणी करून मुबलक कांदा असल्याची खात्री करून तातडीने मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करून घ्यावे

- महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मागणी

- गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्यानं कोसळत आहेत

- येत्या काळात कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात झाला नाही तर अजून दर घसरण्याची भीती

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू

कोल्हापूरातील गारगोटी इंजिनिअरिंगचे शिक्षणानिमित्त शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

तानाजी बाजारी हा विद्यार्थी विहिरी शेजारी कपडे धुवत असताना मित्राने चेष्टामस्करी करीत त्याला विहिरीत ढकलले.

तानाजी बाजारी या विद्यार्थ्याला पोहायला येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी रोहित सुतार या तरुणावर गुन्हा दाखल केलेला आहे.

Nashik News: पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, कुटुंबीयांच्या नावावर १२ कोटींची मलामत्ता

नाशिक ब्रेक -

- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरचं कुटुंब अडचणीत ?

- खेडकर कुटुंबियांचे नॉन क्रिमिलिअर रद्द होणार ?

- खेडकर कुटुंबाच्या नावावर तब्बल १२ कोटी रुपयांची मालमत्ता

Nagpur News: नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड, 5 जण जखमी, एका घराचे नुकसान

- नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड, 5 जण जखमी, एका घराचे नुकसान

- प्रशासनाकडून नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून प्राथमिक माहिती समोर

- प्राथमिक सर्वेक्षणात 20 दुचाकी,40 चारचाकीचे नुकसान झाले तर 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत

- उड्डाणपुलाच्या कामासाठी असणाऱ्या क्रेन जाळण्यात आल्याने सुमारे 70 लाख।रुपयांचे नुकसान झाल्याचा कंस्ट्रक्शन कंपनीचा दावा

Nashik News: सख्ख्या भावांचे हत्या प्रकरण, नाशिक पोलिसांनी ५ जणांना घेतलं ताब्यात

नाशिक -

- दोघा सख्या भावांचं खून प्रकरण

- दोघा भावांच्या खून प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

- हल्लेखोरांची पोलिसांकडून केली जातेय चौकशी

- रात्री दोघा भावांच्या खुनाच्या घटनेने उडाली होती खळबळ

Pune News: पुण्यात पार्किंगवरून राडा, कोंढव्यामध्ये दोन व्यक्तींकडून एकमेकांना मारहाण

पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये अट्टल गुन्हेगाराकडून गाडीमध्ये पोलिस पाटी लावत पार्किंगच्या वादातून मारहाण

गणेश रागपसरे आणि फरहात यांच्यामध्ये गाडी लावण्यावरून वाद

गणेश व फरात एकमेकांवरती केले वार

दोघांनीही एकमेकांना मारलं

गाडीमध्ये सापडली हत्यारं

कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये ३०७ चा गुन्हा दाखल

फरहातवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.