इंडियन प्रीमियर लीगशी स्पर्धा करण्यासाठी पाकिस्तान सुपर लीगची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र दिग्गज खेळाडू या स्पर्धेकडे कायम पाठ फिरवतात. कारण आयपीएलची कोणत्याही स्पर्धेशी तुलना होऊ शकत नाही. आयपीएल स्पर्धा 22 मार्च ते 25 मे दरम्यान होणार आहे. तर पाकिस्तानने कुरापती करत सुपर लीगचं आयोजन याच दरम्यान केलं आहे. 11 एप्रिल ते 18 मे दरम्यान आहे. एकाच वेळी स्पर्धेचं आयोजन केल्याने आयपीएलचं महत्त्व कमी होईल असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला वाटत आहे. त्यांचा हा विचार पाहूनच क्रीडाप्रेमींना हसण्याशिवाय पर्याय उरत नाही. दुसरीकडे, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील एका फ्रेंचायझीने भारतीय कर्णधार रोहित शर्माचा आवाज वापरला आहे. पीएसएलमधील मुल्तान सुल्तान्स संघाने एक प्रोमो जाहीर केला आहे. यात रोहित शर्माचा आवाज वापरल्याने भारतीय क्रीडाप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर जोरदार तू तू मै मै सुरु झालं आहे.
पाकिस्तान सुपर लीग 2025 स्पर्धेतील मुल्तान सुल्तान्स फ्रेंचायझी या व्हिडीओच्या माध्यमातून ट्रॉफी दाखवत आहे. मात्र मस्कट रोहित शर्माच्या आवाजाची नकल केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर रोहित शर्माने याच अंदाजात आपलं म्हणणं मांडलं होतं. ‘हमसे पुछो, इसको जीतने के लिए क्या लगता है.’, असं रोहित शर्मा म्हणाला होता. आता हेच वाक्य पकडून मुल्तान सुल्तानचा मस्कट पीएसएलची ट्रॉफी दाखवत आहे. तसेच रोहितच्या आवाजात तेच वाक्य बोलत आहे.
हा व्हिडीओ पाहताच भारतीय क्रीडाप्रेमी नाराज झाले आहे. भारतीय क्रीडारसिकांच्या मते मोहम्मद रिझवान कर्णधारपद भूषवत असलेल्या मुल्तान सुल्तान्सने रोहित शर्माची खिल्ली उडवली आहे. तसेच क्रीडाप्रेमी आपआपल्या पद्धतीने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेवर तुटून पडले आहे. इतकंच काय तर या प्रकणाची बीसीसीआयने दखल घेण्याची मागणी केली. अनेकांनी भारतीय खेळाडूच्या वाक्याचा वापर स्पर्धेच्या प्रचारासाठी कसा करू शकतात.